---Advertisement---

४५ व्या कुमार-कुमारी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र प्रातिनिधीक संघ निवडीसाठी २०-२० खेळाडूंची निवड

On: बुधवार, फेब्रुवारी 6, 2019 1:05 PM
---Advertisement---

भारतीय हौशी कबड्डी महासंघ मान्यतेने व पश्चिम बंगाल स्टेट युनिट वतीने ४५ वी कुमार-कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दि. १५ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत पश्चिम बंगाल, कोलकाता येथे आयोजित करण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र कुमार – कुमारी दोन्ही प्रतिनिधीक संघाच्या निवडी करता २० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. शेलू-परभणी येथे झालेल्या ४५ व्या कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतून २० मुलांची (कुमार) व २० मुलींची (कुमारी) खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या शिबिरातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र प्रतिनिधीक संघाच्या अंतिम १२ खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सौजन्याने दि. ०८ फेब्रुवारी पासून शिवाजी पार्क, दादर याठिकाणी खेळाडूचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याशिबिरातून अंतिम १२ खेळाडूंचा संघ निवडला जाणार असून तो मुंबई येथून कोलकाता येथे स्पर्धेसाठी रवाना होऊल.

कुमार गट २० खेळाडूंची यादी:
प्रथमेश प्रभाकर साळवी (कोल्हापूर), सौरभ तानाजी पाटील (कोल्हापूर), शुभम नितीन शेळके (पुणे), पवन बाळकृष्ण करांडे (पुणे), असलम मुस्ताफा इनामदार (ठाणे), राजू विजय कथोरे (ठाणे), राहुल रमेश सवर (पालघर), युवराज प्रकाश शिंदे (परभणी), पंकज दीपक मोहिते (मुंबई शहर), भरत विवेक करंगूटकर (मुंबई उपनगर), गणेश डंबरसिंग शाहू (जळगाव), वैभव भाऊसाहेब गर्जे (बीड) ओंकार दीपक कुंभार (रत्नागिरी), राहुल नंदकुमार मुजावर (रायगड), अनिकेत अनिल तेवरे (सांगली), आकाश संतोष शिंदे (नाशिक), तेजल मारुती पाटील (कोल्हापूर), मयूर बिराप्पा शेखे (पुणे), ओंकार दीपक साळुंखे (पालघर), खयुम युसूफ कुरेशी (परभणी)

कुमारी गट २० खेळाडूंची यादी:
सोनाली रामचंद्र हेळवी (सातारा), मृणाली विलास टोणपे (कोल्हापूर), प्रतिक्षा जगदीश तांडेल (मुंबई शहर), स्नेहा दत्ताराम शिंदे (कोल्हापूर), साक्षी अनंत राहटे (मुंबई शहर), वैष्णवी विनायक रवळदकर (सातारा), दिव्या दीपक सकपाळ (रत्नागिरी), राधा विलास मोरे (पुणे), तेजा महादेव सकपाळ (रायगड), लक्ष्मी रामदास गायकन (ठाणे), प्रणाली राजेंद्र नागदेवते (मुंबई उपनगर), जया रावसाहेब राऊत (अहमदनगर), आरती बंडू चव्हाण (परभणी), काजल बाळू खेरे (मुंबई उपनगर), आरती पाडुरंग नागरे (बीड), सुनंदा काशिनाथ पवार (नाशिक), वृषाली रूपा सावंत (सिंधुदुर्ग), गौरी विष्णू घाडगे (सोलापूर), तस्लीम सम्मद बरोंडकर (रत्नागिरी), तृप्ती प्रदीप अंधारे (औरंगाबाद)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment