महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून ६४ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. साताऱ्यातील शाहू क्रीडा संकूलात या महा’कुस्ती’ स्पर्धा पार पडत आहे. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शनिवार (दिनांक ९ एप्रिल) रोजी झालेल्या उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. ( Maharashtra Kesari 2022 )
शुक्रवारी पावसामुळे दिवसभराच्या लढती रद्द करण्यात आल्या होत्या. या लढती शनिवारी सकाळी घेण्यात आल्या. महाराष्ट्र केसरी गट गादी विभागाची अंतिम फेरी हर्षद कोकाटे, पुणे विरुद्ध पृथ्वीराज पाटील, कोल्हापूर यांच्यात झाली. ( Harshad Kokate vs Pruthviraj patil )
अतिशय प्रेक्षणीय झालेल्या या लढतील कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने हर्षद कोकाटेचा धक्कादायक पराभव केला. अगदी एकहाती झालेल्या या कुस्तीत पृथ्वीराज पाटीलकडून हर्षद कोकटेचा ८-० अशा फरकाने पराभव केला गेला. आता या विजयासाह पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढणार आहे.
( Matt Division Prithviraj Patil From Kolhapur Won Shocking Defeat Of Harshad Kokate )
अधिक वाचा
Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील आतापर्यंतचे ९ धक्कादायक निकाल, वाचा एका क्लिकवर
आजवर ‘या’ मल्लांनी जिंकलीये महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा, पाहा संपूर्ण यादी
मोठी घोषणा! आता महिला कुस्तीपटूंचीही महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार