---Advertisement---

Maharashtra Kesari | गतविजेता महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा पराभव, पाहा संपूर्ण कुस्ती

On: शनिवार, एप्रिल 9, 2022 1:51 PM
Harshwardhan-Sadgir
---Advertisement---

सातारा : ६३व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता हर्षवर्धन सदगीर याला ६४व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. हर्षवर्धनचा पुण्याच्या हर्षद कोकाटे याने पराभव केला आहे. अतिशय रंगतदार झालेल्या या लढतीत हर्षदने ७-५ अशा गुण फरकाने सदगीरला पराभूत केले.

या पराभवासह हर्षवर्धनचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. महाराष्ट्र केसरी किताबाचा प्रमुख दावेदार मानला गेलेल्या सदगीरच्या पराभवाने सर्वांनाच धक्का बसला आहे. परंतू दुसरीकडे हर्षद कोकाटेने केलेल्या चिवट कुस्तीने सर्वजण अचंबीत देखील झाले. ( Maharashtra Kesari Champion Harshvardhan Sadgir Lost Harshad Kokate Won )

Live: Maharashatra Kesari

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील उपांत्य फेरीला सुरुवात झाल्यानंतर हर्षवर्धन सदगीर आणि हर्षद कोकाटे यांची कुस्ती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगली हती. सुरुवातीला दोन्ही पैलवानांनी २-२- अशी बरोबरी कुस्ती चालवली होती. पण नंतर मोक्याच्या क्षणी हर्षद कोकाटेने हर्षवर्धन सदगीरवर ७-५च्या फरकाने विजय मिळवला.

अधिक वाचा

Maharashtra Kesari | पृथ्वीराज पाटील vs विशाल बनकर, कोण होणार ‘महाराष्ट्र केसरी’ ? जाणून घ्या पैलवानांबद्दल

Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरीचा प्रमुख दावेदार सिकंदर शेखचा धक्कादाक पराभव, विशाल बनकर विजयी

Maharashtra Kesari | हर्षद कोकाटेचा धक्कादायक पराभव, गादी विभागातून कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विजयी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---