पुणे : प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे. दिनांक ७ ते १० नोव्हेंबर २०२३ दरम्यान फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत या स्पर्धा पार पडतील. स्पर्धेत महाराष्ट्र केसरी होणा-या कुस्तीगीरला महिंद्रा थार तसेच उपमहाराष्ट्र होणा-या कुस्तीगीराला ट्रॅक्टर अशी भरघोस बक्षिसांची लयलूट करण्यात येणार आहे. अशी माहिती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य प्रदीप कंद व कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस पै. योगेश दोडके व पै.विलास कथुरे उपस्थित होते. दिनांक ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस व उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होईल तर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये साधारण ५० हजार प्रेक्षक क्षमता असलेले स्टेडीयम उभारण्यात आले आहे. शाळेचे संस्थापक दीपक पायगुडे यांनी स्टेडियमच्या व्यवस्थेसाठी सहकार्य केले आहे.
प्रदीप कंद म्हणाले, या स्पर्धेत ३६ जिल्हा व ६ महानगर पालिका असे एकूण ४२ संघ सहभागी होत आहेत. एका कुस्ती संघात गादी विभागातील १० व माती विभागातील १० असे एकूण २० कुस्तीगीर २ कुस्ती मार्गदर्शक व १ संघ व्यवस्थापक असे एकूण २३ जणांचा सहभाग असेल. साधारण या कुस्ती स्पर्धेत ८४० कुस्तीगीर ८४ कुस्ती मार्गदर्शक व ४२ व्यवस्थापक, ८० पंच व ५० पदाधिकारी असे एकूण ११०० जणांचा सहभाग असेल.
संदीप भोंडवे म्हणाले, कुस्तीगीरांचे आगमन, वैद्यकीय तपासणी आणि वजने दिनांक ६ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. दिनांक ७ नोव्हेंबर रोजी स्पर्धेचे उद्घाटन होईल. त्यानंतर कुस्त्यांना सुरुवात होईल. दिनांक १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सर्व वजन गटातील अंतिम कुस्त्या व महाराष्ट्र केसरी किताबाची कुस्ती होणार आहे.
स्पर्धेतील उर्वरीत वजन गटात प्रथम क्रमांक मिळविलेल्या कुस्तीगीर स्प्लेंडर दुचाकी, व्दितीय कमांकास रोख २० हजार रोख व तृतीय कमांकास रोख १० हजार रोख बक्षीस म्हणून देण्यात येतील. या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत शासनाच्या वतीने प्रथम क्रमांकास ६० हजार, व्दितीय कमांकास ५५ हजार व तृतीय क्रमांकास ५० हजार रूपयांचे मानधन दरवर्षी प्रमाणे देण्यात येणार येणार आहे. (Maharashtra Kesari Competition to be held from November 7, Mahindra Thar, tractors with prizes for winners)
महत्वाच्या बातम्या –
दिल्लीच्या वायू प्रदूषणाचा विश्वचषक 2023ला धोका, बांगलादेश पाठोपाठ श्रीलंकेचेही सराव सत्र रद्द
पावसानंतर विजय पाकिस्तानच्या अजून जवळ, डीएलएसनुसार करायच्या आहेत फक्त ‘इतक्या’ धावा