पुण्यात दिमाखात महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेची सुरुवात 1961साली झाली होती. त्यानंतर आतापर्यंत अनेक मल्लांनी या महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आहे. सध्या ही कुस्ती स्पर्धा महर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरू आहे.
गुरुवारी (12 जानेवारी) दिवसाच्या शेवटच्या लढतीमध्ये बाला रफिक शेख (Bala Rafique) याने साताऱ्याच्या किरण भगत (Kiran Bhagat) याला केवळ एक मिनिटाच्या आत दुहेरी पट टाकत चितपट केले. रफिकने केवळ पंधरा सेकंदात भगतवर बाला रफिकला मात दिली. यावेळी किरण भगत कुस्ती दरम्यान किरकोळ जखमी झाला.
या स्पर्धेत समीर शेख आणि बाला रफिक शेख हे दोघे सहभागी झाले आहेत. यामध्ये हे दोघे भाऊ एकाच वेळी आणि माती विभागात आपली ताकद आजमावत होते हे पाहून उपस्थित प्रेक्षकांनीही टाळ्यांचा कडकडाट केला. रफिकला विजय मिळाला तर माती विभागात समीर शेखला पराभव पत्करावा लागला.
तिसऱ्या फेरीत वाशिमचा सिकंदर शेख आणि मुंबई चा इंदुर्के यांच्या पुन्हा एकदा तुल्यबळ लढत झाली. दोन्ही मल्लांनी तुफानी खेळ करत भारंदाज डाव मारत विक्रमी दहा गुणांची कमाई करत महाराष्ट्र केसरी किताबाचा आपला दावा कायम राखला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSL: दुसऱ्या वनडेदरम्यान टीव्ही स्क्रीनवर झळकली द्रविडची आकडेवारी, हेड कोचची रिऍक्शन व्हायरल
वनडेमध्ये 5व्या क्रमांकावर राहुलची बॅटींग जबरदस्तच! आकडेवारी एकदा पाहाच