कोल्हापूरचा रांगडा मल्ल पृथ्वीराज पाटीलने शनिवारी (दि. ०९ एप्रिल) साताऱ्यातील शाहू क्रीडा संकुलात जिल्ह्यात पार पडलेल्या ६४व्या ‘महाराष्ट्र केसरी‘ कुस्ती स्पर्धेचा किताब पटकावला. त्याने विशाल बनकरचा ५-४ असा जवळचा पराभव केला. पृथ्वीराजने त्बल २१ वर्षांनंतर कोल्हापूरला ही गदा मिळवून दिली. मात्र, यावेळी त्याने एक मोठी खंत व्यक्त केली. जेव्हाही मल्ल ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावतात, तेव्हा त्यांच्यावर मोठ-मोठ्या बक्षिसांचा पाऊस पडतो. मात्र, यंदा असं काहीही घडलं नाही.
फक्त १९ वर्षांच्या वयात ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावण्याचा कारनामा पृथ्वीराजने करून दाखवला. मात्र, त्याला विजयाची गदा तर मिळालीच, पण बक्षीस काहीच मिळालं नसल्याची बातमी सर्वत्र पसरली. जागतिक कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या सोनबा गोंगाने या मल्लानेही यावर आपले मत मांडले. तो म्हणाला की, “हे मल्ल गरीब कुटुंबातून येतात. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख रक्कम दिली पाहिजे.”
शंभुराज देसाईंचे मोठे वक्तव्य
पृथ्वीराज पाटीलला बक्षीस न मिळाल्याबद्दल गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की, “पृथ्वीराज पाटील यांना बक्षीस का दिले गेले नाही, याची माहिती घेतली जाईल.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “मल्ल हे खूप मेहनतीने किताब मिळवतात. जर बक्षीस देण्याची जबाबदारी शासनाची असेल, तर शासनाकडून बक्षीस नक्कीच दिलं जाईल. मात्र, जर ही जबाबदारी आयोजकांची असेल, तर आयोजकांना सूचना दिल्या जातील. बक्षीस न देणे ही मोठी चूक आहे.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Maharashtra Kesari | पृथ्वीराज पाटील नवा ‘महाराष्ट्र केसरी’, जिंकली मानाची गदा! विशाल बनकर पराभूत