पुणे: क्रीडालेखक संजय दुधाणे लिखित गौरवशाली महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा गेल्या 56 वर्षांचा इतिहासावर महाराष्ट्र केसरी यशोगाथा पुस्तकाचे प्रकाशन आज होत आहे.
भूगाव येथील मामासाहेब मोहोळ कुस्तीनगरीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासरहेब लांडगे, हिंदकेसरी अमोल बराटे, महाराष्ट्र केसरी विजय बनकर यांच्या हस्ते व स्पर्धेचे संयोजक शांताराम इंगवले, शिवाजी अप्पा तांगडे, राहूल शेडगे, स्वस्तिक चोंधे, राहूल शेडगे, अनिल पवार उपस्थित रहाणार आहे.
कुस्तीमहर्षी बाळासाहेब लांडगे यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली असून 50 महाराष्ट्र केसरी विजेत्याचा सचित्र इतिहास या पुस्तकाव्दारे प्रथमच प्रकाशित होत आहे. प्रा. दुधाणे यांचे हे 20 वे पुस्तक असून ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्यावरही त्यांनी वाचनीय पुस्तक लिहिले होते. हिंदकेसरी यशोगाथा हे पुस्तकाचाही यंदा प्रकाशन झाले आहे.
लंडन ऑलिम्पिक, रिओ ऑलिम्पिकचे वृत्तांकन करणार्या दुधाणे हे दरवर्षी अष्टपैलू नावाने दिवाळी अंक प्रकाशित करीत असतात.
आयोजक व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने स्पर्धेतील विजेत्यांना हे पुस्तक भेट दिले जाणार आहे.