भारतीय हौशी कबड्डी महासंघ व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने ६६ वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दि. २८ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत रोहा, रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे.
या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी श्री. प्रताप शिंदे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन कडून नियुक्ती करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्या कबड्डी असोसिएशनच्या सौजन्याने दि. १३ जानेवारी पासून अलिबाग रायगड या ठिकाणी ३० खेळाडूचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरापासून प्रताप शिंदे हे संघासोबत असतील.
प्रताप शिंदे हे महाराष्ट्र पोलीस कबड्डी संघाचे माजी खेळाडू आहेत. मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष असून त्यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. सहकार्यवाहक काम केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–“चिंतामणी चषक” राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धेचे असे होणार बादफेरीचे सामने