पंचवार्षिक निवडणूक २७ मे व घटना दुरुस्तीला धर्मदाय आयुक्तांनी मंजुरी दिल्यास उपाध्यक्ष आणि संयुक्त कार्यवाह अशी दोन पदे महिलांकरिता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. च्या आज दि.२५फेब्रु. रोजी झालेल्या “विशेष सर्वसाधारण” सभेत घेण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी किशोर पाटील होते. ही निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. घटना दुरुस्तीकरिता लवकरच धर्मदाय आयुक्तांना पत्र देण्यात येईल.
शिवाय ज्या जिल्हा संघटनेचा कार्यकाळ संपला असून त्यांनी अद्याप निवडणूक घेतली नाही,अशा जिल्हा संघटनांनी लवकरात लवकर निवडणुका घेऊन त्याचा अहवाल धर्मदाय आयुक्तांना सादर करावा. त्याची मिळालेली पोच राज्य संघटनेकडे सादर करावी.
घटनेप्रमाणे निवडणूक न घेणाऱ्या जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींना राज्य संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. जे खेळाडू संघटनेशी संवाद न साधता थेट प्रसार माध्यमाद्वारे संघटनेवर आरोप करतात. त्यांना जिल्हा संघटनांनी आवर घालावे अन्यता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे अध्यक्षानी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
ऍटलिट कमिशनवर देखील या सभेत चर्चा झाली. पण ठोस निर्णय काय घेण्यात आला नाही.