धुळ्याचे डॉ.प्रा. भालचंद्र मोरे राज्यात प्रथम. पालघरचा निखिल घरत आणि मुं. शहराची अश्विनी देसाई यांना संयुक्त दुसरा क्रमांक
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने ऑकटोबर २०१७ मध्ये कबड्डी पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई शहर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी- चाफे, रत्नागिरी- दापोली, रत्नागिरी- खेड, रत्नागिरी- लांजा, सिंधुदुर्ग, सांगली, अहमदनगर, नाशिक, धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, बीड, सोलापूर अशा १९ केंद्रावर घेण्यात आलेल्या या परिक्षेकरिता एकूण ६४३ जिल्हा पंच या परीक्षेला बसले होते.
त्यापैकी ४४९ परीक्षार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. धुळ्याचे डॉ. प्रा. भालचंद्र रामकृष्ण मोरे हे १८१गुण मिळवून राज्यात पहिले आले. तर पालघरचा निखिल रवींद्र घरत आणि मुं. शहराची कु. अश्विनी सूर्यकांत देसाई यांनी १७८ गुण मिळवून संयुक्तपणे दुसरा क्रमांक पटकावला.
ज्या जिल्ह्यात पंच परीक्षा घेण्यात आल्या त्या जिल्ह्यांना निकालाची प्रत लवकरच पाठविण्यात येईल. आज हा निकाल राज्य संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील, कार्याध्यक्ष दत्ताभाऊ पाथरीकर, सरचिटणीस आस्वाद पाटील व पंच समिती अध्यक्ष मनोहर इंदुलकर यांच्या परवानगीने पंच समिती सचिव शशिकांत राऊत यांनी जाहीर केला.
गुणानुक्रमे पहिले पाच क्रमांक मिळवून उत्तीर्ण झालेले परीक्षार्थी खालीलप्रमाणे:-
१) प्रथम क्रमांक :- डॉ.प्रा. भालचंद्र मोरे – धुळे . १८१ गुण.
२) द्वितीय क्रमांक (संयुक्तपणे) अ) रवींद्र घरत – पालघर , ब) कु.अश्विनी देसाई – मुं. शहर . दोघांना १७८गुण.
३) तृतीय क्रमांक :- अच्युत सातवी – पालघर . १७७ गुण.
४) चतुर्थ क्रमांक :- (संयुक्तपणे) अ) मयुर पवार – पालघर , ब) जमशिदखान मोहम्मद हमीदखान पठाण – धुळे दोघांना १७६.
५) पाचवा क्रमांक :- ( संयुक्तपणे) अ) विठ्ठल माने – उस्मानाबाद, ब) विशाल पाटील – पालघर, क) तुषार धनवडे – सांगली, ड) गणेश पाटील – पालघर चौघांना १७४गुण.