गतवर्षी टोकियो ऑलिंपिक एकवर्षाने पुढे ढकलण्यात आले होते. आता ही ऑलिंपिक स्पर्धा यावर्षी जुलै-ऑगस्टदरम्यान खेळवण्यात येणार आहे. दरम्यान एक मोठे वृत्त पुढे येत आहे की, महाराष्ट्राचा पॅरा (व्यंगत्त्व असलेला) जलतरणपटू सुयश नारायण जाधव याने टोकियो ओलिंपिकच्या पात्रता फेरीत प्रवेश केला आहे. यासह तो ऑलिंपिक किंवा पॅरा ऑलिंपिक स्पर्धेचे तिकीट मिळवणारा पहिलाच भारतीय जलतरणपटू ठरला आहे.
सुयश आता टोकियो ऑलिंपिकमधील ५० मीटरच्या एस-७ वर्गात आणि २०० मीटरच्या वैयक्तिक मेडलीच्या एसएम-७ वर्गात सहभाग घेणार आहे. २०१८ साली जकार्तामध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेतील प्रदर्शनाच्या जोरावर त्याने पात्रता फेरीत धडक मारली आहे.
या स्पर्धेतील ५० मीटर बटरफ्लाय फेरीचा टप्पा पार करण्यासाठी त्याला ०.३२.९० सेकंदाचा कालावधी देण्यात आला होता. यावेळी त्याने अवघ्या ०.३२.७१ सेकंदात ही फेरी पूर्ण केली होती आणि सुवर्णपदक जिंकले होते. याबरोबरच २०० मीटर मेडली फेरी पूर्ण करण्यासाठी २.५७.०९ सेकंदाचा अवधी होता आणि त्याने २.५६.५१ सेकंदात ही फेरी पार करत कांस्य पदक जिंकले होते. तो सध्या बालेवाडीच्या साई केंद्रात सराव करत आहे.
सुयशने मिळवलेल्या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भारणे यांनीही त्याची प्रशंसा केली आहे. ‘माळशिरस तालुक्यातील वेळापूरचे सुपुत्र, जलतरणपटू सुयश जाधव यांची टोकियो येथे होणाऱ्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. आपल्या मेहनतीच्या व जिद्दीच्या बळावर जागतिक व्यासपीठावर सोलापूरचे नाव उज्वल करणाऱ्या सुयश जाधव यांचा मला अभिमान वाटतो,’ असे त्यांनी लिहिले आहे.
https://twitter.com/bharanemamaNCP/status/1398548032723906565?s=20
वडिलांची होती इच्छा
सुयशचे वडील हे राज्यस्तरावरील जलतरणपटू राहिले आहेत. त्यांची इच्छा होती की त्यांच्या मुलानेही मोठे झाल्यानंतर जलतरणपटू बनावे. परंतु वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी सुयशसोबत एक अपघात झाला आणि या अपघातातच त्याने आपले दोन्ही हात गमावले. परंतु व्यंगत्त्वामुळे तो आपल्या वडिलांच्या स्वप्नापासून माघार घेतली नाही. त्याने मेहनत घेतली आणि स्वतला वर्ल्ड क्लास जलतरणपटू म्हणून सिद्ध केले. गतवर्षी त्याने अर्जुन पुरस्कारही पटकावला होता. याबरोबरच २०१६ मध्ये तो ए मार्कच्या रियो ऑलिंपिकमध्येही पात्र ठरला होता. परंतु यावेळी त्याला कोणतेही पदक जिंकता आले नव्हते.
महत्त्वाच्या बातम्या-
तो मुलगा नक्की कोण? धोनीच्या व्हायरल झालेल्या जून्या फोटोवर चाहत्यांना पडला प्रश्न
बिग ब्रेकिंग! आयपीएल २०२१चे राहिलेले सामने होणार ‘या’ देशात, बीसीसीआयने शनिवारी घेतला निर्णय
पंत-धोनीच्या तुलनेचे सत्र सुरूच; बालपणीचे प्रशिक्षक संतापून म्हणाले, ‘सतत त्यांची तुलना कशाला?’






टी20 वर्ल्डकप 2026: एमएस धोनी करणार का कमेंट्री? माजी कर्णधारने दिला थेट उत्तर