मुंबई:- हैद्राबाद येथे होणाऱ्या ४९व्या राष्ट्रीय कुमार/कुमारी गट कबड्डी स्पर्धेेकरीता महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.ने आज आपला १२ जणांचा चमू जाहीर केला. याशिका पुजारी(मुंबई उपनगर पूर्व) हिच्याकडे किशोरी, तर रजत सिंग(मुंबई उपनगर पश्र्चिम) यांच्याकडे कुमार गटाचे नेतृत्व सोपविण्यात आले. दिनांक १ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत हैद्राबाद येथील कसानी कृष्णा मुदियाल आणि जे. एस. गेहलोत अकॅडमीच्या मैदानावर हे सामने होतील. महाराष्ट्राच्या या निवडण्यात आलेल्या संघाचा ठाणे येथील येऊर येथे जोरदार सराव शिबीर प्रशांतदादा फाऊंडेशन व विठ्ठल क्रीडा मंडळ यांच्या सौजन्याने घेण्यात आले. महाराष्ट्राचा निवडण्यात आलेला हा संघ दिनांक ३० जानेवारी रोजी रात्रौ १०-००वाजता ठाणे येथून देवगिरी एक्सप्रेसने स्पर्धेकरीता हैद्राबादला रवाना होईल. निवडण्यात आलेला हा संघ राज्य कबड्डी असो.चे सचिव बाबुराव चांदेरे यांनी एका पत्रकाद्वारे सर्व प्रसार माध्यमाकरीता जाहीर केला. तो खालील प्रमाणे. (Maharashtra team announced for 49th National Kumar/Kumari Group Kabaddi Tournament to be held in Hyderabad.)
कुमारी गट संघ :- १) याशिका पुजारी(संघनायिका)- मुं. उपनगर पूर्व, २)झुवेरिया पिंजारी – पुणे ग्रामीण, ३)भूमिका गोरे – पिंपरी-चिंचवड, ४)ऋतुजा अवघडी – कोल्हापूर, ५)अर्चना सरेले – पिंपरी-चिंचवड, ६)समृद्धी मोहिते – मुं. उपनगर पूर्व, ७)निकिता लंगोटे – परभणी, ८)नयना झा – मुं.उपनगर पश्र्चिम, ९)ऋतुजा आंबी – सांगली, १०)हरजित कौर संधू – मुं.उपनगर पूर्व, ११)वैभवी जाधव – पुणे ग्रामीण, १२)अनिशा निकम – कोल्हापूर.
प्रशिक्षक :- मालोजी भोसले. व्यवस्थापिका :- चंद्रिका केळकर – जोशी.
कुमार गट संघ :- १)रजत सिंग(संघनायक) – मुं.उपनगर पश्र्चिम, २)जयेश महाजन – नंदुरबार, ३)अनुज गावडे – पुणे ग्रामीण, ४) वरुण खंडाळे – नंदुरबार, ५)अतुल जाधव – परभणी, ६)साहिल पाटील – कोल्हापूर, ७)सिद्धार्थ सौतोने – पिंपरी-चिंचवड, ८)वैभव खाडे – कोल्हापूर, ९)विक्रम परमार – पिंपरी-चिंचवड, १०)यश निंबाळकर – पालघर, ११) ओम कुडाळे – मुं.उपनगर पश्र्चिम, १२)अभिराज पवार – सांगली.
प्रशिक्षक :- शंतनु पांडव. व्यवस्थापक :- समीर खेडेकर,
महत्वाच्या बातम्या –
राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी चुरस देशभरातील ४७० अव्वल नौकानयनपटूंचा सहभाग
भारताला धक्यावर धक्के! कसोटी पराभवानंतर आयसीसीची बुमराहवर मोठी कारवाई, वेगवन गोलंदाजाने काय केलं एकदा वाचाच