अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी २०१९-२० स्पर्धांसाठी महाराष्ट्र शासनाचे दोन्ही संघ जाहीर करण्यात आले आहेत. इनडोअर मैदान गव्हर्नरमेंट कॉलेज, कोटशेरा, चौरा मैदान, शिमला हिमाचल प्रदेश येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक १५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०१९ दरम्यान ही स्पर्धा होईल.
महाराष्ट्र शासनाचा पुरुष कबड्डी संघ जाहीर करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचा महिला कबड्डी संघही जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनामध्ये विविध खात्यात सेवेत असलेल्या खेळा़डूंमधून महाराष्ट्र संघ निवडला जातो.
महाराष्ट्र शासनाच्या महिला संघाच्या कर्णधारपदी सुवर्णा बारटक्के यांची निवड करण्यात आली आहे. ज्या मुंबई उपनगर जिल्हाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत. तसेच या संघात स्नेहल साळुंखे, सायली जाधव, दीपिका जोसेप यादी खेळाडूंचा महाराष्ट्र संघात सहभाग आहे.
महाराष्ट्र शासन कबड्डी संघ:-
महिला संघ: सुवर्णा बारटक्के (कर्णधार) स्नेहल शिंदे, प्रियांका तावडे, सायली जाधव, विद्या शिरास, मनिषा मानकर, कल्पिता शिंदे, माधुरी परब, पूजा मचले, जयश्री साठे, अश्विनी थोरवे, स्वाती काकडे, भारती देवीकर, दीपिका जोसेप.
प्रशिक्षक- दिलीप कडू
व्यवस्थापक- गणेश भोईर
पुरुष संघ: सूरज कांबळे (कर्णधार) निलेश चिंदरकर, संतोष जाधव, संदीप इंदुलकर, ऋषिकेश डिचोळकर, कल्पेश जाधव, महेंद्रसिंग चव्हाण, सुरेंद्रसिंग मेहरा, अंकुश महाले, गणेश काळे, विक्रम कदम, गोरख पवार, महेश सावकारे, शशांक पवार,
प्रशिक्षक- प्रीतम सनकुलकर
व्यवस्थापक- मदन बावसकर