बिहार येथे झालेल्या ३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा मुलांनी अंतिम विजेतेपद पटकावले. ९ वर्षांनी महाराष्ट्र किशोर गट संघाने सुवर्णपदक पटाकवले. अंतिम सामन्यात हरियाणाचा ३७-३६ असा पराभव केला होता.
यास्पर्धेत महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदाची धुरा पियुष पाटीलकडे होती. याविजयात पियुषची भूमिका महत्वाची होती. तसेच दीपक, आझाद, अमरसिंग, प्रवण, शब्बीर यांनी महाराष्ट्राचा विजयात मोलाची भूमिका बजावली. यास्पर्धेत सर्वांत्कृष्ट खेळाडू म्हणून कृष्णा चव्हाण यांची निवड झाली.
काळपासून रोहा,रायगड येथे भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६६ व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय स्पर्धेला सुरुवात झाली. यास्पर्धाच अत्युच्य साधून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन कडून महाराष्ट्र किशोर गट संघाला गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनकडून संघातील १२ खेळाडू, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक यांना प्रत्येकी रोख रक्कम १५,००० रुपये देऊन गौरविण्यात आले. यावेळी सुनील तटकरे, जयंत पाटील, पार्थ पवार, रायगड जिल्हा परिषद सदस्य, व कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.