पुणे: राज्य संघटनेच्या भरीव आणि धोरणात्मक कार्यामुळे महाराष्ट्र हे शरीरसौष्ठवातील देशातील सर्वात बलशाली राज्य आधीच बनले आहे. पण आता आपल्या राज्याला शरीरसौष्ठवाची शान बनविणार आहोत.
शरीरसौष्ठवाकडे पाहिल्यावर प्रत्येक राज्याला वाटावं की राज्य असावे तर महाराष्ट्रासारखे, शरीरसौष्ठवपटू असावे तर महाराष्ट्रासारखे, आयोजन असावे तर महाराष्ट्रासारखे. हेच आपले ध्येय असल्याचे महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे नवे अध्यक्ष प्रशांत आपटे यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या ध्येयधोरणांनूसार पदाधिकाऱयांची वयोमर्यादा निश्चित केल्यामुळे व्यायाममहर्षी मधुकरराव तळवलकर यांनी राज्य संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षांच्या निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत अनेक वर्षे ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे सर्वेसर्वा आणि असंख्य शरीरसौष्ठवपटूंचे आश्रयदाते असलेल्या प्रशांत आपटे यांची अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याच्या शरीरसौष्ठव संघटनेने गेल्या चार वर्षात तीन राष्ट्रीय स्पर्धा, जागतिक स्पर्धा तसेच अनेक देशपातळीवरच्या स्पर्धांचे भव्यदिव्य आयोजन करून राज्याने आपली ताकद अवघ्या देशाला दाखवून दिली आहे.
एवढेच नव्हे तर येत्या ऑक्टोबर महिन्यात पुण्यात आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारीही राज्यावरच आहे. महाराष्ट्रात शरीरसौष्ठव खेळाची केझ वाढविताना राज्य संघटनेने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत, जे शरीरसौष्ठवपटूंच्या पथ्यावर पडलेत.
फक्त खेळ आणि खेळाडूंचा विचार करणाऱया या राज्य संघटनेने गेल्dया चार वर्षात बक्षीसापोटी पाच कोटींची उधळण केली आहे. आपले खेळाडू श्रीमंत झाले तर आपला खेळही श्रीमंत होणार, याच उद्देशाने राज्य संघटना आपले कार्य प्रामाणिकपणे करीत आलीय आणि पुढेही करणार असे आश्वासन नव्या अध्यंक्षांनी दिले. व्यायाममहर्षी तळवलकरांनी केलेले कार्य पुढेही त्याच जोमाने करण्याचा प्रयत्न करू, असेही आपटे म्हणाले.
शरीरसौष्ठवाची केझ पाहाता उदयोन्मुख तसेच नामांकित शरीरसौष्ठवपटूंमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून आपण आगामी काळात विविध मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करणार असल्याचीही माहिती आपटे यांनी दिली.
त्याचप्रमाणे विदेशी दौऱयावर महाराष्ट्राकडून देशाचे नाव उंचावण्यासाठी घाम गाळणाऱया शरीरसौष्ठवपटूंना आर्थिक सहकार्य करण्यासाठीही एक निधी उभारण्याचा आपला मानस असून यासाठी लवकरच एक कार्यक्रम निश्चित केला जाईल.
आपल्या कार्यकाळात राज्याची संघटनाच नव्हे तर राज्याचे खेळाडूही आर्थिक आणि शारिरीकदृष्ट्या श्रीमंत व्हावेत, हेच आपले प्रमुख ध्येय असल्dयाचे आपटे यांनी स्पष्ट केले. राज्य संघटनेची अन्य पदाधिकारी तेच असून ऍड. विक्रम रोठे यांच्याकडे सरचिटणीसपदाची सुत्रे आहेत. विद्यमान संघटनेत हेमचंद्र पाटील कार्यकारी उपाध्यक्ष असून खंदे कार्यकर्ते मदन कडू कार्यकारी संचालकपदी कायम आहेत.
प्रशांत आपटे यांच्या नेतृत्वाखाली राज्याची संघटना आणखी बलशाली होईल, असा विश्वास मधुकरराव तळवलकरांनी व्यक्त केला तर आपटेंसारख्या कार्यसम्राट संघटकांमुळे राज्य संघटना आणखी जोशाने आपले कार्य सुरू ठेवील, अशा शुभेच्छा भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सर्वेसर्वा चेतन पाठारे यांनी दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
-भावनिक विराट कोहलीने मानले भारतीय चाहत्यांचे आभार
-कुलदीप यादवला निष्प्रभ ठरवण्यासाठी आम्ही सज्ज- मार्क वुड