पुणे, ६ जुलै २०१७: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित ४४ व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कर्नाटक संघाने ५५८ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मध्य प्रदेशच्या अव्दैत पागे व परम बिरथरे, कर्नाटकच्या श्रीहरी नटराज, महाराष्ट्राच्या वेदांत बापना व तामिळनाडूच्या विकास पी यांनी विक्रमासह सुवर्णपदक पटकावले तर महाराष्ट्रच्या त्रिशा कारखानीस, निल रॉय, रेना सलढाणा व केनिशा गुप्ता यांना सुवर्णपदक पटाकावले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील जलतरण तलाव येथे पार पडलेल्या या स्पर्धेत १५०० मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलांच्या १५-१७ वयोगटात मध्य प्रदेशच्या अव्दैत पागेने १६.०६.४३ सेकंद वेळ नोंदवत विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले.अव्दैतने कर्नाटकच्या सौरभ सांगवेकरचा २०११ सालचा १६.०८.८० सेकंदाचा विक्रम मोडला. महाराष्ट्रच्या सुश्रुत कापसेने १६.१९.६२ सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले तर दिल्ली कुशाग्रा रावतने १६.४६.९२ सेकंदासह कांस्य पदक पटकावले.
२०० मी बटरफ्लाय प्रकारात मुलांच्या १३-१४ वयोगटात मध्य प्रदेशच्या परम बिरथारेने २.११.२७ सेकंद वेळ नोंदवत विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. परमने कर्नाटकच्या अॅरन डिसुझाचा २००६ सालचा अकरा वर्षापुर्वीचा विक्रम मोडीत काढला. तर कर्नाटकच्या तनिश मॅथ्यु व प्रसिधा कृष्णा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक संपादन केले. मुलांच्या १५-१७ वयोगटात कर्नाटकच्या राहूल एम याने २.१०.८३ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले तर महाराष्ट्रच्या वेदांत खांडेपारकरने २.१०.९३ सेकंद व मिहिर आंब्रेने २.११.१३ सेकंद वेळ नोंदवत अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
१०० मी बॅकस्ट्रोक प्रकारात मुलांच्या १५-१७ वयोगटात कर्नाटकच्या श्रीहरी नटराजने आपलाच ५७.९९ सेकंदाचा विक्रम मोडीत काढत ५७.३३ सेकंदासह सुवर्णपदक संपादन केले. गोव्याच्या झेविअर डिसुझा व दिल्लीच्या अनुराग दगर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक संपादन केले. मुलांच्या १३-१४ वयोगटात महाराष्ट्राच्या वेदांत बापनाने कर्नाटकच्या एन.श्रीहरीचा २०१५ सालचा १.०२.७० सेकंदाचा विक्रम मोडीत काढत १.०२.४१ सेकंदासह सुवर्णपदक पटकावले. वेदांत बॅम्बे स्कॅस्टीश शाळेत नववी इयत्तेत शिकत असून अमॅच्युअर अॅक्वेटिक अकादमी येथे प्रशिक्षक पीटर गारट्रेल व भुषण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. दिल्लीच्या तन्मय दास व महाराष्ट्रच्या आर्यन भोसले यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
१०० मी बटरफ्लाय प्रकारात मुलींच्या १५-१७ वयोगटात महाराष्ट्रच्या त्रिशा कारखानीसने १.०५.१३ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. कर्नाटकच्या मयुरी लिंगराज व राजस्थानच्या फिरदुश कयामखानने अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलींच्या १३-१४ वयोगटात आसामच्या आस्था चौधरी १..०७.२५ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले. तर तमिळनाडूच्या प्रियांगा पुगाझारासू व दिल्लीच्या रिंकी बोरदोलोई यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
१०० मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलांच्या १५-१७ वयोगटात महाराष्ट्राच्या निल रॉयने ५३.१६ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. गोव्याच्या झेविअर डिसुझाव तामिळनाडू गोकुळनाथ व्ही.एस यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलांच्या १३-१४ वयोगटात तामिळनाडूच्या विकास पी याने ५५.३८ सेकंद वेळ नोंदवत विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. विकासने कर्नाटकच्या संजय सी.जे याचा २०१५ सालचा ५५.४७ सेकांदचा विक्रम मोडला. कर्नाटकच्या तनिश मॅथ्यु व हरियाणाच्या वीर खाटकर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
१०० मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलींच्या १५-१७ वयोगटात महाराष्ट्रच्या रेना सलढाणाने १.००.१३ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले तर साध्वि धुरीने १.००.८७ सेकंदासह रौप्य पदक पटकावले. मध्य प्रदेशच्या अॅनी जैन १.०१.०३ सेकंद वेळ नोंदवत कांस्य पदक पटकावले. मुलींच्या १३-१४ वयोगटात महाराष्ट्रच्या केनिशा गुप्ताने १.००.२६ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. केनिशाचे हे या स्पर्धेतील पाचवे सुवर्णपद आहे. कर्नाटकच्या खुशी दिनेश व आसामच्या आस्था चौधरी यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण अर्जून पुरस्कार विजेते कबड्डीपटू शांताराम जाधव, आणि महाराष्ट्र स्टेट अॅमॅच्युअर अॅक्वेटिक असोसिएशनचे अध्यक्ष अभय दाढे, भारतीय ऑलंपिक असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष विरेंद्र नानावटी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र स्टेट अॅमॅच्युअर अॅक्वेटिक असोसिएशनचे सचिव जुबिम अमेरिया व स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव कमलेश नानावटी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
1500मी फ्रीस्टाईल मुले(15-17 वयोगट)- 1.अव्दैत पागे( मध्य प्रदेश,16.06.43से), 2. सुश्रुत कापसे(महाराष्ट्र,16.19.62से), 3.कुशाग्रा रावत(दिल्ली,16.46.92से)
200मी बटरफ्लाय मुले(13-14 वयोगट)- 1. परम बिरथरे(मध्य प्रदेश,2.11.27से), 2. तनिश मॅथ्यु(कर्नाटक, 2.12.29से), 3.प्रसिधा कृष्णा(कर्नाटक, 2.12.80से)
200मी बटरफ्लाय मुले(15-17 वयोगट)- 1. राहूल एम(कर्नाटक,2.10.83से), 2.वेदांत खांडेपारकर(महाराष्ट्र,2.10.93से), 3.मिहिर आंब्रे(महाराष्ट्र,2.11.13से)
100मी बॅकस्ट्रोक मुले(15-17 वयोगट)- 1.श्रीहरी नटराज(कर्नाटक, 57.33से), 2. झेविअर डिसुझा(गोवा, 1.00.65से), 3. अनुराग दगर(दिल्ली, 1.02.29से)
100मी बॅकस्ट्रोक मुले(13-14 वयोगट)- 1. वेदांत बापना(महाराष्ट्र, 1.02.41से), 2. तन्मय दास(दिल्ली, 1.02.51से), 3. आर्यन भोसले(महाराष्ट्र, 1.02.68से)
100मी बटरफ्लाय मुली(15-17 वयोगट)- 1. त्रिशा कारखानीस(महाराष्ट्र, 1.05.13से), 2. मयुरी लिंगराज(कर्नाटक, 1.05.95से), 3. फिरदुश कयामखान(राजस्थान, 1.07.71से)
100मी बटरफ्लाय मुली(13-14 वयोगट)- 1.आस्था चौधरी(आसाम, 1.07.25से), 2. प्रियांगा पुगाझारासू(तमिळनाडू, 1.08.65से), 3. रिंकी बोरदोलोई(दिल्ली, 1.09.58से)
100मी फ्रीस्टाईल मुले(15-17 वयोगट)- 1.निल रॉय(महाराष्ट्र, 53.16से), 2. झेविअर डिसुझा(गोवा, 53.47से), 3. गोकुळनाथ व्ही.एस(तामिळनाडू, 53.62से)
100मी फ्रीस्टाईल मुले(13-14 वयोगट)- 1.विकास पी(तामिळनाडू, 55.38से), 2. तनिश मॅथ्यु(कर्नाटक, 55.54से), 3. वीर खाटकर(55.98से)
100मी फ्रीस्टाईल मुली(15-17 वयोगट)- 1. रेना सलढाणा(महाराष्ट्र, 1.00.13से), 2. साध्वि धुरी(महाराष्ट्र, 1.00.87से), 3.अॅनी जैन(मध्य प्रदेश, 1.01.03से)
100मी फ्रीस्टाईल मुले(13-14 वयोगट)- 1.केनिशा गुप्ता(महाराष्ट्र, 1.00.26से), 2. खुशी दिनेश(कर्नाटक, 1.02.80से), 3. आस्था चौधरी(आसाम, 1.03.05से)
1500मी फ्रीस्टाईल मुली(15-17 वयोगट)- 1. अभिशिक्ता पी.एम(तामिळनाडू,18.35.65से), 2. धृती मिर्लीधर(कर्नाटक,18.47.47से), 3. प्राची टोकस(दिल्ली,18.54.26से)
4x200मी फ्रीस्टाईल मुले(15-17 वयोगट)- 1. कर्नाटक(अर्नव दिवाकर, हेमंत जेनुकल, राहूल एम, श्रीहरी नटराज, 7.57.07से), 2.महाराष्ट्र(निल रॉय, अनिकेत चव्हाण, वेदांत खांडेपारकर, एरॉन फर्नांडीस, 7.58.69से), 3.तामिळनाडू(आदित्य डी, अहमद अझाक, चरण एम.एस, गोकुळनाथ व्ही.एस, 8.19.70से)
4x200मी फ्रीस्टाईल मुले(13-14 वयोगट)- 1. कर्नाटक(प्रसिधा कृष्णा, लितेश गौडा, अभय कुमार, तनिश मॅथ्यु, 8.35.44से), 2.महाराष्ट्र(आर्यन भोसले, आरमान सिक्का, वेदांत बापना, साहिल गंगोटी, 8.37.45से), 3. आसाम(राजदिप गोगई, अनुध्यान हजारीका, ज्ञान दश्यप,बिक्रम चंगमई, 8.46.39)
4x100मी मिडले मुली(13-14 वयोगट)- 1. कर्नाटक(सुवाना भास्कर, पुजीता मुर्ती, रचना राव, खूशी दिनेश, 4.45.53से), 2. महराष्ट्र(केनिशा गुप्ता, आकांक्षा शहा, सिया बिजलानी, कनिष्का शौकीन, 4.50.14से), 3. गोवा(श्रृंगी बांदेकर, वैष्णवी एच, तनिशा मुर्गुड, मिहिका करापुरकर, 5.01.45से)
400मी मिडले मुली(15-17 वयोगट)- 1.फिरूदुश कयामखान(राजस्थान, 5.31.18से), 2. जहंती राजेश(कर्नाटक, 5.31.52से), 3. ऋतूजा तळेगावकर(महाराष्ट्र, 5.31.80से)
400मी मिडले मुली(13-14 वयोगट)- 1. जान्हवी गोली(तेलंगणा, 5.35.88से), 2. सिया बिजलानी(महाराष्ट्र, 5.40.25से), 3.साची जी(कर्नाटक, 5.42.14से)
800मी फ्रीस्टाईल मुले(13-14 वयोगट)- 1. आर्यन नेहरा(गुजरात, 9.00.56से), 2. झीदाने सय्यद (गोवा, 9.16.55से), 3. राज राळेकर(कर्नाटक, 9.24.70से)
सर्वोत्कृष्ट जलतरणपटू मुले- श्रीहरी नटराज- 27गुण, 3विक्रम आणि 2सर्वेत्कृष्ट भारतीय
मुली- रेना सलढाणा- 33गुण
केनिशा गुप्ता-35गुण, 1विक्रम
सांघिक विजेतेपद मुले- 1.कर्नाटक- 132गुण, 2. कर्नाटक-142गुण
मुली- महाराष्ट्र-1. 141गुण, 2. कर्नाटक 144गुण
सर्वसाधारण विजेतेपद- कर्नाटक 558गुण
नवीन विक्रम- 25