पुणे : मॉडर्न पेंटॅथलॉनच्या आठव्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने बायथले आणि ट्रायथलेमध्ये ६५ पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राला ट्रायथलेमध्ये ८ सुवर्ण, ७ रौप्य व ६ कांस्य पदके तर बायथलेमध्ये १७ सुवर्ण, १७ रौप्य आणि १० कांस्य पदके मिळाली.
राजस्थानने ट्रायथलेमध्ये ३ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्यपदकाने दुसरे स्थान पटकावले. तर उत्तर प्रदेशने २ सुवर्ण व १ कांस्यपदकासह तिसरा क्रमांक पटकाविला. बायथलेमध्ये बिहार संघ दुसºया आणि पाँडिचेरी संघ १ सुवर्णपदक पटकावून तिसºया स्थानी राहिले. स्पेनमध्ये होणाºया जागतिक बायथले आणि ट्रायथले स्पर्धेसाठी भारताचा संघ या स्पर्धेतून निवडला जाणार आहे.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र आलिम्पिक असोसिएशनचे सचिव बाळासाहेब लांडगे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांच्या हस्ते झाले. यावेळी एशियन मॉडर्न पेंटॅथलॉनचे सचिव आणि इंडियन आॅलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारीणी सदस्य नामदेव शिरगावकर,मॉडर्न पेंटॅथलॉन फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष सुनील पुर्णपात्रे,दयानंद कुमार, सत्यवीर सिंग, ुुविठ्ठल शिरगावकर, अमित गायकवाड, मुख्य प्रशिक्षक जितेंद्र खासनिस, हर्षद इनामदार, सायली ठोसर उपस्थित होते.
*पदकतालिका : ट्रायथले: (सुवर्ण, रौप्य, कांस्य ) 1. महाराष्ट्र ८-७-६ , 2. राजस्थान ३-२-१, 3. उत्तर प्रदेश २-०-१, 4. आंध्र प्रदेश ०-३-२ बायथले: 1. महाराष्ट्र १७-१७ -१०, 2. बिहार १-०-० 3., पुडुचेरी १-०-० , 4. उत्तर प्रदेश ०-०-४, 5. राजस्थान ०-१-१, 6. गुजरात ०-०-१
*इतर निकाल –
प्रौढ गट अ गट पुरूष (२०० मीटर जलतरण व १२०० मीटर धावणे) : हिरेन बुझरूक – १७ मिनिटे ४३.२८ सें. (महाराष्ट्र), संजय विखे – १८ मिनिटे ५४.८० से. (महाराष्ट्र), रामानंद राय – २३ मिनिटे १९.६०सें. (उत्तर प्रदेश).
महिला : विभावरी राजधन्य – २५ मिनिटे १२.१७ सें., राहील युवा ब गट मुले (२०० मीटर जलतरण व १२०० मीटर धावणे) : राहुल शिंदे – ११ मिनिटे १५.८१ सें., राजकुमार पवार – ११ मिनिटे ५१.९७सें., पार्थ खराटे – १२ मिनिटे १०.२२सें. (सर्व महाराष्ट्र).
दिव्यांग गटातही महाराष्ट्राच्याच खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजविले.
दिव्यांग गट पुरूष (५० मीटर जलतरण व २०० मीटर धावणे) : अमेय गायल – २ मिनिटे ५८.९४सें., रोहन मोरे – ३ मिनिटे १७.३५सें., ओंकार तळवळकर – ९ मिनिटे ३८.८सें. (सर्व महाराष्ट्र).
गतीमंद पुरूष (५० मीटर जलतरण व २०० मीटर धावणे) : सोवमिल कोवाडकर – ३ मिनिटे २९.१२सें., चिन्मय पाठक – ४ मिनिटे ४.९७सें., ऋत्वीक जोशी – ४ मिनिटे ५४.७१सें. (सर्व महाराष्ट्र).
गतीमंद महिला (५० मीटर जलतरण व २०० मीटर धावणे) : गौरी गाडगीळ – ६ मिनिटे ५.३३सें., तन्वी देवधर – ८ मिनिटे १४.२३सें. (दोघीही महाराष्ट्र).
कनिष्ठ महिला (२०० मीटर जलतरण व १६०० मीटर धावणे) : बाबी कुमारी – २३ मिनिटे ९.५९सें. (बिहार), विहा चित्रोडा – २४ मिनिटे २९.१७सें. (महाराष्ट्र), सृष्टी भारती – २८ मिनिटे १२.१६सें. (उत्तर प्रदेश).