पुणे। बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ज्युनियर(21वर्षाखालील) स्नूकरमध्ये मुलांच्या गटात स्पर्श फेरवानी, एस.श्रीकृष्णा, दिग्विजय कडीयन, अमन बनसोड या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत ज्युनियर(21वर्षाखालील) स्नूकर मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या स्पर्श फेरवानी याने आपला राज्य सहकारी क्रिश गुरबक्षानीचा 3-1(74(52)-17, 21-82(39), 58-18, 60(38)-57(40)) असा तर, हरयाणाच्या दिग्विजय कडीयन याने तामिळनाडूच्या आदेश कोठारीचा 3-0(65-22, 68(62)-24, 69-34) असा एकतर्फी पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
अटीतटीच्या लढतीत आंध्रप्रदेशच्या अमन बनसोड याने उत्तरप्रदेशच्या विश्वजीत मोहनचा 3-2(70-25, 25-85, 40-69, 71-08, 71-64) असा तर, पीएसपीबीच्या एस. श्रीकृष्णा याने आपली विजयी मालिका कायम ठेवत महाराष्ट्राच्या सुमेर मागोचा 3-2(30-65(43), 71(44)-44, 26-56, 72(72)-00, 77-08)असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
वरिष्ठ बिलियर्ड्स गटात अंतिम पात्रता फेरीत महाराष्ट्राच्या रिषभ कुमार याने तामिळनाडूच्या विजय निचानीवर 3-1(20-101(74), 101-86, 100(88)-98(98), 100-51 असा सनसनाटी विजय मिळवत मुख्य फेरीत धडक मारली.
रिषभ याने आपल्या खेळीत पहिल्या व तिसऱ्या फ्रेममध्ये अनुक्रमे 74 व 88 गुणांचा ब्रेक नोंदविला. महाराष्ट्राच्या महेश जगदाळे याने शयान राझमीचा 3-2(100(57)-62, 100-52, 88-100, 88-100, 100-84)असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल।
ज्युनियर स्नूकर।
उपांत्यपूर्व फेरी।
अमन बनसोड(आंध्रप्रदेश)वि.वि.विश्वजीत मोहन(उत्तरप्रदेश)3-2(70-25, 25-85, 40-69, 71-08, 71-64);
एस. श्रीकृष्णा(पीएसपीबी)वि.वि.सुमेर मागो(महाराष्ट्र)3-2(30-65(43), 71(44)-44, 26-56, 72(72)-00, 77-08);
स्पर्श फेरवानी(महाराष्ट्र)वि.वि.क्रिश गुरबक्षानी(महाराष्ट्र)3-1(74(52)-17, 21-82(39), 58-18, 60(38)-57(40));
दिग्विजय कडीयन(हरयाणा)वि.वि.आदेश कोठारी(तामिळनाडू)3-0(65-22, 68(62)-24, 69-34);
वरिष्ठ बिलियर्ड्स |
अंतिम पात्रता फेरी।
महेश जगदाळे(महाराष्ट्र)वि.वि.शयान राझमी(महाराष्ट्र)3-2(100(57)-62, 100-52, 88-100, 88-100, 100-84);
शेखर सुर्वे(आरएसपीबी)वि.वि.आदेश कोठारी(तामिळनाडू)3-1(102-37, 80-100, 102-96, 100-33);
रिषभ कुमार(महाराष्ट्र)वि.वि.विजय निचानी(तामिळनाडू)3-1(20-101(74), 101-86, 100(88)-98(98), 100-51;
दुर्गा प्रसाद(आरएसपीबी)वि.वि.एल. नागराज(कर्नाटक)3-0(100-36, 100-11, 100(50)-25);
आशुतोष पाधी(ओडिशा)वि.वि.संदीप सिंग यादव(मध्यप्रदेश)3-0(101-13, 100-73, 101-40);
रोविन डिसुझा(आरएसपीबी)वि.वि.राजवर्धन जोशी(महाराष्ट्र)3-0(101(50)-70, 100(48)-85, 100-93(40);
चंदू कसोदरिया(महाराष्ट्र)वि.वि.गोविंद राज रेड्डी(आरएसपीबी)3-1(51-102, 100-84, 100-72, 100-74)
वरून कुमार(तामिळनाडू)वि.वि. शिवम अरोरा(महाराष्ट्र)3-2(101-40, 45-100, 102-87, 69-101, 100-93).