---Advertisement---

महर्षी दयानंद महाविद्यालय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2023 । महर्षी दयानंद महाविद्यालयाला दुहेरी विजेतेपद.

On: बुधवार, डिसेंबर 13, 2023 4:23 PM
File Photo
---Advertisement---

मुंबई:- महर्षी दयानंद महाविद्याल्याने आयोजित केलेल्या “५०व्या महाविद्यालयीन राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत” महर्षी दयानंद महाविद्यालयाने वरिष्ठ महाविद्यालय आणि महिला महाविद्यालय गटात विजेतेपद मिळवित दुहेरी यश संपादन केले. महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात झालेल्या वरिष्ठ गटाच्या अंतिम सामन्यात महर्षी दयानंद अ ने महर्षी दयानंद ब चा प्रतिकार २८-२२ असा मोडून काढत ” स्व. अजय वर्मा स्मृती फिरता रजत चषक” आपल्या नावे केला. पहिल्या सत्रात ११-१० अशी आघाडी घेणाऱ्या अ ने दुसऱ्या स्त्रात देखील सावध खेळ करीत हा विजय साकारला. संकेत मोरे, साहिल टिळेकर यांच्या चढाई – पकडीच्या संयमी खेळाला या विजयाचे श्रेय जाते. मोक्याच्या क्षणी साहिलने केलेल्या पकडी डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या होत्या. ब संघाकडून क्रिश, रितेश यांनी कडवी लढत दिली. पण संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.

महिलांच्या अंतिम सामन्यात महर्षी दयानंद अ ने महर्षी दयानंद ब चा २७-२४ असा पराभव करीत “स्व. सुमती अंकुश माळकर स्मृती फिरता रजत चषकावर” आपले नाव कोरले. आक्रमक सुरुवात करीत १६-०७ अशी आघाडी घेणाऱ्या अ संघाला दुसऱ्या डावात ब संघाने विजयासाठी चांगलेच झुंजविले. शेवटी ३गुणांच्या फरकाने अ ने आपला विजय साकारला. समृद्धी भगत, ऊर्जा साळगावकर अ संघाकडून, तर ईशा खोपकर, रक्षा जाधव ब संघाकडून उत्तम खेळल्या. या स्पर्धेचे बक्षिस वितरण महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती छाया पानसे यांच्या शुभहस्ते झाले. तदप्रसंगी महाविद्यालयातील माजी कबड्डी व खो खो खेळाडू बहुसंख्येने उपस्थित होते. (Maharishi Dayanand College State Level Kabaddi Tournament 2023. Maharshi Dayanand College double title.)

महत्वाच्या बातम्या – 
INDvsSA: सामन्यानंतर तिलक वर्माचे मोठे विधान; पराभवाचे कारण सांगत म्हणाला, ‘आमचे सलामीवीर फ्लॉप…’
World Cup 2023 Finalच्या पराभवानंतर रोहितचा पहिला Interview, वेदना लपवू शकला नाही कर्णधार; Video करेल भावूक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---