श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने हा निवृत्तीनंतर पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून आपली सेकंड इनिंग खेळत आहे. जगभरातील विविध लीगमध्ये प्रशिक्षक म्हणून त्याने आपली छाप पाडली. जगातील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाला त्याने तीन वेळा स्वतःच्या मार्गदर्शनाखाली विजेते बनवले. आता त्याच फ्रॅंचायजीकडून मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर जयवर्धनेने त्याच्या दुसऱ्या एका लीगमधील संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.
जयवर्धने 2017 पासून मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक होता. मात्र, ऑगस्ट महिन्यात त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला. कारण, मुंबई इंडियन्स संघाच्या मालकांनी दक्षिण आफ्रिकेतील द दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये एमआय केपटाऊन व युएईतील इंटरनॅशनल लीग टी20 या स्पर्धेत एमआय एमिरेट्स नावाचा संघ खरेदी केला आहे. या तीनही संघांची एकत्रित जबाबदारी म्हणून जयवर्धनेकडे ग्लोबल हेड हे पद दिले गेले.
या पदाचा स्वीकार केल्यानंतर आता जयवर्धने याने इंग्लंडमधील द हंड्रेड लीगमध्ये प्रशिक्षण देत असलेल्या सदर्न ब्रेव्हज संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबई इंडियन्स फ्रॅंचाईजीकडून मिळालेल्या अतिरिक्त जबाबदारीमुळे आपण हा निर्णय घेतल्याचे त्याने म्हटले.
काही दिवसांपूर्वीच त्याने हा निर्णय ब्रेव्हज संघ व्यवस्थापनाला कळवला होता. सदर्न ब्रेव्हज संघाने जयवर्धने याच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद पटकावले होते. मात्र, दुसऱ्या हंगामात संघाची कामगिरी घसरली. त्यामुळे त्यांना सातव्या स्थानी समाधान मानावे लागले. जयवर्धने यांनी राजीनामा दिल्याने ब्रेव्हज संघ व्यवस्थापनाने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे.
(Mahela Jayawardena Resign As Southern Braves Head Coach)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयचा आणखी एक क्रांतिकारी निर्णय! यंदाच्या रणजी ट्रॉफीत दिसणार कधीही न घडलेली गोष्ट
बीसीसीआयचा आणखी एक क्रांतिकारी निर्णय! यंदाच्या रणजी ट्रॉफीत दिसणार कधीही न घडलेली गोष्ट