---Advertisement---

महेंद्रसिंग धोनी ठरला IPL च्या इतिहासातील सर्वोकृष्ट संघाचा कर्णधार, पाहा संपूर्ण संघ

On: सोमवार, फेब्रुवारी 19, 2024 11:05 AM
MS-Dhoni
---Advertisement---

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलच्या इतिहासातील सर्वोकृष्ट संघाचा कर्णधार ठरवण्यात आले आहे. तसेच आयपीएलला 2008 मध्ये सुरवात झाली होती. तर कमी कालावधीमध्येच आयपीएल ही जगातील सर्वोत्तम टी-20 क्रिकेट लीग ठरली आहे. तसेच 20 फेब्रुवारीला आयपीएलच्या पहिल्या निलावाला 16 वर्षे पूर्ण होणार आहेत. याच निमित्ताने स्ट्रार स्पोर्ट्सने आत्तापर्यतची सर्वोकृष्ट टीम बनवली आहे. 

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने पाच वेळा आयपीएल करंडक उंचावला आहे आणि पाच वेळा उपविजेता राहिला आहे. याबरोबरच स्टार स्पोर्टने माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि जवळपास 70 पत्रकारांच्या साहाय्याने सर्वोकृष्ट टीम बनवली आहे. या माजी क्रिकेटपटूंच्या पॅनेलमध्ये वसीम आक्रम, मॅथ्यू हेडन, डेल स्टेनसारखे दिग्गज क्रिकेटपटू सहभागी झाले होते.

याबरोबरच,ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीर डेव्हिड वॉर्नर आणि भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली यांची सलामीवीर म्हणून टीममध्ये निवड करण्यात आली आहे. तर ‘यूनिवर्सल बॉस’ क्रिस गेलला वन डाऊला ठेवण्यात आले आहे. तसेच मध्यक्रमामध्ये सुरेश रैना, एबी डिव्हिलियर्स, सूर्यकुमार यादव आणि एम एस धोनी यांचा समावेश आहे. तर हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा आणि कायरना पोलार्ड यांना अष्टपैलू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.

तसेच फिरकी गोलंदाज म्हणून अफगाणिस्तानचा रशीद खान, विंडीजचा सुनील नारायण, भारताचा युझवेंद्र चहलचा समावेश आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये श्रीलंकेचा लसिथ मलिंगा, भारताचा जसप्रीत बुमराह यांना स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, टॉम मूडी म्हणाला आहे की, ‘रोहित शर्मा हा देखील चांगला कर्णधार आहे, पण मुंबई इंडियन्सकडे नेहमीच उत्कृष्ट खेळाडू आहेत.’ ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन म्हणाला की, धोनीमध्येही संघाचा प्रशिक्षक बनण्याची क्षमता आहे. मॅथ्यू हेडन म्हणाला, ‘ही एक स्पष्ट निवड आहे, येथे कोणताही वाद नाही. हे संपूर्ण भारतीय समाजाचे एकमत आहे. अर्थात, हिटमॅन रोहित शर्मा देखील एक उत्कृष्ट कर्णधार आहे, परंतु मी धोनीची कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून निवड करेन.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---