अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलच्या नव्या पर्वाची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहात आहेत. या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीची धडाकेबाज फलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळेल अशी क्रिकेटप्रेमींना आशा आहे. दुसरीकडे महेंद्रसिंह धोनीचे लाखोंनी चाहते असले तरी त्याच्या निवृत्तीबाबत नेहमीच विचारले जाते. असे असतानाच त्याने फेसबूकवर एक पोस्ट केली आहे. त्याच्या या पोस्टमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
On Popular Demand! Here’s the full travel video from Leo’s gallery! 📹🦁#DenComing pic.twitter.com/0JjVoRm8UK
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 6, 2024
याबरोबरच, महेंद्रसिंह धोनी हा आयपीएलमध्ये यशस्वी कर्णधार राहिलेला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ज या संघाला एकूण पाच जेतेपदं मिळवून दिलेली आहेत. यंदाच्या हंगामातही तोच कर्णधारपादची जबाबदारी सांभाळेल अशी अपेक्षा आहे. मात्र धोनीने नव्या भूमिकेचा उल्लेख केल्यामुळे त्याच्याकडे कर्णधारपद असेल का? तो निवृत्त होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केली जातायत. धोनी जर निवृत्त होणार असेल तर चेन्नईचा नवा कर्णधार कोण? याचीही चर्चा आता रंगली आहे.
Note pannunga pa! 📝
Masterclass ft. Rajiv 🦁🔥#WhistlePodu 💛 pic.twitter.com/A6TnfUl2pF— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 7, 2024
दरम्यान, आयपीएलच्या २०२२ सालच्या हंगामात महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर चेन्नई संघाची जबाबदारी रवींद्र जाडेजावर सोपवण्यात आली होती. काही सामन्यांत जाडेजाने चेन्नईचे नेतृत्व केले होते. मात्र नंतर त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. जाडेजाच्या या निर्णयानंतर चेन्नईचे कर्णधारपद पुन्हा एकदा धोनीकडेच आले होते. त्यामुळे धोनी या हंगामात निवृत्त होणार असेल, तर पुन्हा एखदा चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा जाडेजाकडे सोपवली जाणार का? असेही विचारले जातं आहे.
अशी असू शकते सीएसकेचे प्लेइंग इलेव्हन
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, रवींद्र जडेजा, मथिशा पाथिराना, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, प्रशांत सोलंकी.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : अर्रर्र..! रोहित शर्मा केवळ टी-20 आणि वनडेमध्येच नव्हे तर कसोटीतही षटकारांचा बादशहा, पाहा रेकॉर्ड
- IND Vs ENG : मुशीर खानने सरफराज खानचे गुपित केले उघड, सांगितला आऊट करण्याचा प्लन,’ म्हणाला..