fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

‘शिवनेरी’ कबड्डी स्पर्धेत महिंद्रा अँड महिंद्रा, महाराष्ट्र पोलीस, शिवशक्ती महिला संघ, अमर हिंद मंडळ अंतिम फेरीत.

दादर:– शिवनेरी सेवा मंडळ, दादर आयोजित कबड्डी स्पर्धेत काल (७ ऑक्टोबर) उपांत्य फेरीच्या लढती झाल्या. विशेष व्यावसायिक गटात महाराष्ट्र पोलीस व महिंद्रा अँड महिंद्रा संघानी अंतिम फेरीत धडक मारली. महिला गटात शिवशक्ती महिला संघ व अमर हिंद मंडळ संघानी अंतिम फेरी गाठली.

विशेष व्यावसायिक गटात एयर इंडिया विरुद्ध महाराष्ट्र पोलीस यांच्यात उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्र पोलीस संघाने ३३-१८ असा सहज विजय मिळवत अंतिम फेरीत गाठली. महाराष्ट्र पोलीस कडून चढाईत महेंद्र राजपूत, सुलतान डांगे व बिपिन थले यांनी उत्कृष्ट खेळ केला. पकडीत रोहित बनेने पकडीत चांगला खेळ केला.

महिंद्रा अँड महिंद्रा विरुद्ध भारत पेट्रोलियम यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीचा सामना अटीतटी झाला. २६-२६ असा बरोबरीत सुटलेला हा सामना ५-५ चढाईत महिंद्रा अँड महिंद्राने ८-४ (३४-३०) अशी बाजी मारली.

महिला गटात अमर हिंद मंडळ विरुद्ध डॉ. शिरोडकर स्पो.क्लब यांच्यात झालेल्या उपांत्य सामन्यात अमर हिंद मंडळाने ३२-२९ असा विजय मिळवला. मध्यंतरपर्यत २०-१४ अशी आघाडी अमर हिंद मंडळाकडे होती. शिवशक्ती महिला संघाने विश्वशांती मंडळाचा ५१-०४ असा धुव्वा उडवला.

व्यावसायिक अ श्रेणी गटात टी बी एम स्पोर्टसने शिवास एंटरप्राइजवर ४८-२२ असा विजय मिळवला. तर इनकम टॅक्स संघाने भारत पेट्रोलियम(शिवडी) वर २७-२२ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

महाविद्यालयिन गटात वंदे मातरम डोंबिवली संघाने २८-१९ असा महर्षी दयानंद कॉलेजवर विजय मिळवला. ठाकूर कॉलेजने ३३-२४ असा सिद्धार्थ कॉलेजवर विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवले. सर्व गटाचे अंतिम सामने उद्या (९ ऑक्टोबर) रोजी होणार आहेत.

You might also like