सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. डर्बन येथे झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल 111 धावांनी विजय साजरा केला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात फलंदाज टीम डेव्हिड याचे महत्त्वाचे योगदान राहिले. त्याने एक तुफानी अर्धशतक झळकावले. त्यानंतर अवघ्या काही तासातच त्याला त्याच्या या खेळीचे बक्षीस भेटले असून, प्रथमच त्याचा ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात समावेश करण्यात आला.
सिंगापूरसाठी काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर डेव्हिड याने मागील वर्षी ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले. तत्पूर्वी त्याने जगभरातील सर्व टी20 लीगमध्ये धमाकेदार कामगिरी करत लक्ष वेधून घेतले होते. आयपीएलमध्ये तो दोन वर्षांपासून मुंबई इंडियन्सचा भाग असून त्याला तेथे विशेष ओळख मिळाली. सध्या तो ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघाचा नियमित सदस्य आहे.
आक्रमक फटकेबाजी साठी ओळखल्या जाणाऱ्या डेव्हिड याने बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात वादळी खेळी केली. त्याने अवघ्या 28 चेंडूंमध्ये 64 धावा फटकावल्या. यामध्ये चार उत्तुंग षटकार सामील होते. त्याच्या या खेळीमुळे प्रभावित झालेल्या ऑस्ट्रेलिया निवड समितीने आगामी वनडे मालिकेसाठी देखील त्याला ऑस्ट्रेलिया संघात जागा दिली आहे.
टी20 मालिकेनंतर होणाऱ्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत तो खेळताना दिसेल. या मालिकेत त्याची कामगिरी चांगली राहिल्यास ऑक्टोबर महिन्यात होत असलेल्या वनडे विश्वचषकासाठी त्याची निवड केली जाऊ शकते. हा विश्वचषक भारतात खेळला जाणार असून, डेव्हिड याला भारतात खेळण्याचा पुरेसा अनुभव आहे. फलंदाजीला पोषक भारतीय खेळपट्ट्यांवर तो शानदार कामगिरी करू शकतो. विश्वचषकासाठी त्याची ऑस्ट्रेलिया संघात निवड झाल्यास तो ऑस्ट्रेलिया संघाच्या फिनिशरची जबाबदारी पार पाडेल.
(Maiden ODI Call Up For Tim David After Shine Against South Africa In T20)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानची आशिया चषकात विजयी सलामी, नवख्या नेपाळचा 238 धावांनी पराभव
“भारत-पाकिस्तान द्वंद्व ऍशेसपेक्षा सरस”, ऑसी दिग्गजाने दिली कबुली