सामना सुरू असून शेवटच्या चेंडूत दोन धावांची आवश्यकता आहे. तेव्हा फलंदाज त्या दोन धावा काढतो आणि संघाला सामना जिंकून देतो. तेव्हा पंचांचा निर्णय येतो की जिंकलेला संघ हरला ते. आता हे कसे शक्य आहे. हे शक्य आहे, कारण क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. मेरिलबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) क्रिकेटच्या वेगवेगळ्या ७३ नियमांमध्ये बदल केला असून मंगळवारी (३ फेब्रुवारी) याची घोषणा केली.
एमसीसीच्या एका नियमामध्ये पेनल्टी रनबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. एमसीसीच्या ४१.१७.२ नुसार सामना जिंकल्यानंतर पंचांच्या मैदानाबाहेर जाण्याआधी कोणत्याही संघाने नियमांचे उल्लंघन केले तर पंच त्याला पेनल्टी रन देऊ शकतात. त्यासाठी एमसीसीने एक उदाहरणही दिले आहे, सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर फलंदाज एक धाव घेत जिंकत असला आणि त्याने गोलंदाजासमोर जाऊन त्याचे सेलेब्रेशन करताना त्याच्या थोबाडीत मारली तर संघाला पेनल्टी रन मिळेल आणि जिंकलेला संघ हरेल.
यावरून खेळाडूंनी त्यांचा राग, आनंद अनावर होऊ देता कामा नये. त्याचे परिणाम संघाला भोगावे लागतील. यामुळे पेनल्टी रन मिळाला की सामना पुन्हा सुरू होईल, तेव्हा निकाल काहीही लागू शकतो.
एमसीसीने खालील नियमांमध्ये बदल केला आहे.
विकेट पडली तरी शेवटचे षटक सुरूच राहणार–
एमसीसीने जाहीर केलेल्या क्रिकेट नियमांच्या नवीन आवृत्तीमधील १२.५.२ नुसार, कसोटी सामन्यांसह बहुदिवसीय क्रिकेटमधील दिवसाच्या खेळातील शेवटचे षटक, जर त्यात विकेट गेली तर त्या दिवसाचा खेळ संपणार नाही. ते षटक पूर्ण केले जाईल आणि नवीन फलंदाजाला मैदानात यावे लागेल.
यामुळे गोलंदाजांसाठी उत्तम तर नव्या फलंदाजांच्या अडचणी वाढल्या दिसेेल.
हिट विकेट (३५.१.१ आणि ३५.२)- चेंडू खेळल्यानंतर फलंदाजाने आपला तोल सावरेपर्यंत चेंडू स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असते. जर फलंदाज खेळलेल्या शॉटमुळे असंतुलित झाला, काही पावले इकडे-तिकडे गेला आणि स्टम्पवर पडला, तर हे सर्व त्याने चेंडू स्वीकारण्यासाठी केलेल्या कृतीचा परिणाम असतो. चेंडू कदाचित खूप दूर गेला असेल, पण तरीही फलंदाज ‘हिट विकेट’ बाद होतो.
तसेच त्या फलंदाजाची बॅट पहिले विकेटकीपरला नंतर स्टम्प्सला लागली तर तो बाद होणार नाही.
ओव्हर-थ्रो (१९.८)- एमसीसीने म्हटले की कोणताही क्षेत्ररक्षक सीमारेषेबाहेर चेंडू फेकून आतमध्ये असलेल्या संघसहकाऱ्याला देत असले आणि तो सीमारेषेबाहेर जात असेल, तर त्याला बाउंड्री मानले जाईल.
चेंडू थांबवण्याचा प्रयत्न असो किंवा सीमारेषेजवळ असलेल्या दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडे तो पास करणे असो – याला ‘ओव्हरथ्रो’ मानले जाऊ नये.
डेड बॉल (२०.१.१.१) – चेंडू पूर्णपणे स्थिर होण्यासाठी तो गोलंदाज किंवा विकेटकीपरच्या हातातच असण्याची आता आवश्यकता नाही. तो कोणत्याही क्षेत्ररक्षकाच्या हातात असू शकतो, किंवा जमिनीवर स्थिर पडलेला असू शकतो. यामुळे, एखादा क्षेत्ररक्षक किंवा फलंदाज खेळ सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत असला तरीही, चेंडू कधी ‘डेड’ झाला हे ठरवण्यासाठी पंचांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळते.
हे नियम १ ऑक्टोबर, २०२६पासून लागू होणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेशी (आयसीसी) एक चर्चासत्र घेतले जाईल आणि त्यामध्ये या नियमांबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. एमसीसीने याआधी दोनवेळा नियमांमध्ये बदल केला आहे. पहिल्यांदा त्यांनी २०२९ आणि नंतर २०२२मध्ये नियम बदलले होते.





