क्रीडा मंत्रालयानं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ची घोषणा केली आहे. यावर्षी देशाचा हा सर्वोच्च क्रीडा सन्मान मनू भाकर (नेमबाज), डी गुकेश (बुद्धीबळ), हरमनप्रीत सिंह (हॉकी) आणि प्रवीण कुमार (पॅरा हाय जंप) या 4 खेळाडूंना मिळेल. या खेळाडूंचा सत्कार समारंभ 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनात होईल.
समितीनं केलेल्या शिफारशींच्या आधारे सरकारनं मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार यांना खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच मनू भाकरचं नाव खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केलेल्या खेळाडूंच्या यादीत समाविष्ट नसल्यामुळे वाद निर्माण झाला होता. तथापि, नंतर स्वतः मनूनं कबूल केलं की कदाचित तिच्याकडून चूक झाली असेल.
22 वर्षीय मनू भाकरनं 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत 2 पदकं जिंकून इतिहास रचला होता. ती एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू आहे. याच खेळांमध्ये हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघानं कांस्यपदक जिंकलं होतं. ऑलिम्पिकमध्ये भारतानं कांस्यपदक जिंकण्याची ही सलग दुसरी वेळ आहे.
बुद्धिबळपटू डी गुकेश काही आठवड्यांपूर्वीच बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला होता. त्यानं वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी विश्वविजेतेपद पटकावलं. पॅरा ॲथलीट प्रवीण कुमारनं 2024 पॅरिस पॅरालिम्पिकच्या टी64 प्रकारातील उंच उडीत सुवर्णपदक जिंकलं होतं.
खेलरत्न पुरस्कारासह क्रीडा मंत्रालयानं अर्जुन पुरस्कारानं सन्मानित होणाऱ्या एकूण 32 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 17 पॅरा ॲथलीट्सचा समावेश आहे.
अर्जुन पुरस्कार मिळालेले खेळाडू
(1) ज्योती याराजी (ॲथलेटिक्स)
(2) अन्नू राणी (ॲथलेटिक्स)
(3) नीतू (बॉक्सिंग)
(4) स्वीटी (बॉक्सिंग)
(5) वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
(6) सलीमा टेटे (हॉकी)
(7) अभिषेक (हॉकी)
(8) संजय (हॉकी)
(9) जर्मनप्रीत सिंग (हॉकी)
(10) सुखजित सिंग (हॉकी)
(11) राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी)
(12) प्रीती पाल (पॅरा ॲथलेटिक्स)
(13) जीवनजी दीप्ती (पॅरा ॲथलेटिक्स)
(14) अजित सिंग (पॅरा ॲथलेटिक्स)
(15) सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा ॲथलेटिक्स)
(16) धरमबीर (पॅरा ॲथलेटिक्स)
(17) प्रणव सुरमा (पॅरा ॲथलेटिक्स)
(18) एच होकातो सेमा (पॅरा ॲथलेटिक्स)
(19) सिमरन जी (पॅरा ॲथलेटिक्स)
(20) नवदीप (पॅरा ॲथलेटिक्स)
(21) नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)
(22) तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)
(23) नित्य श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन)
(24) मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)
(25) कपिल परमार (पॅरा ज्युदो)
(26) मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)
(27) रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी)
(28) स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)
(29) सरबज्योत सिंग (शूटिंग)
(30) अभय सिंग (स्क्वॉश)
(31) साजन प्रकाश (स्विमिंग)
(32) अमन (कुस्ती)
हेही वाचा –
सिडनी कसोटीत आकाश दीपच्या जागी कोण खेळणार? हे 3 खेळाडू शर्यतीत
17 वर्षानंतर लंकेचा न्यूझीलंडमध्ये विजय, 2006 नंतर पहिल्यांदाच किवी संघाचा घरात पराभव
IND vs AUS: सिडनी कसोटीत टीम इंडियाची प्लेइंग 11 बदलणार? या खेळाडूचे होणार कमबॅक