मेजर जनरल विक्रम डोगरा हे आयर्नमॅन ट्रायथेलॉन स्पर्धा पुर्ण करणारे पहिलेच भारतीय लष्करी अधिकारी बनले आहेत. ही स्पर्धा आॅस्ट्रियामध्ये पार पडली. जगातील सर्वात कठीण समजली जाणारी ही एकदिवसीय स्पर्धा त्यांनी 1जुलैला पुर्ण केली.
आयर्नमॅन ट्रायथेलॉनमध्ये 3 सलग स्पर्धा होतात. यात 3.8 स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42.2 किलोमीटर अशा क्रमाने स्पर्धा होतात. तसेच त्यात कोणतीही विश्रांती नसते.
मेजर जनरल विक्रम डोगरा यांच्या या कामगिरीबद्दल लष्कर प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी सांगितले की, “ते भारतीय लष्करी सेवेतील एकमेव आधिकारी आहेत ज्यांनी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली आहे. तसेच जगातील ते हा कारनामा करणारे एकमेव जनरल आहेत.”
या स्पर्धेत एकूण 50 देशातील 2850 अॅथलिट्सने सहभाग घेतला होता. यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना आयर्नमॅन हा किताब मिळवण्यासाठी ही स्पर्धा 17 तासात योग्य क्रमाने पुर्ण करणे गरजेचे असते.
आॅस्ट्रियामधील क्लॅजेनफर्ट या शहरात ही आयर्नमॅन स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा मेजर जनरल विक्रम डोगरा यांनी 14 तास 21 मिनिटात पुर्ण केली.
Major General Vikram Dogra of 17 Poona Horse globally became the first General to participate & successfully complete #Ironman, Austria on 1 Jul 2018 which included 3.8 km of swimming, 180 km of cycling & 42.2 km running. 2850 athletes from 50 countries participated in the event pic.twitter.com/inDWWUsCVw
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) July 3, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–विंबल्डनमध्ये एकेरीत खेळणाऱ्या भारतीय खेळाडूला पराभूत होऊनही मिळाले ३५ लाख रुपये
–मास्टर ब्लास्टर खूपच कमी गोलंदाजांचे असे कौतुक करतो!
–तब्बल १८ महिन्यांनी त्याने केले शतक; मधल्या काळात काय कामगिरी केली पहाच