नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई हिने मंगळवारी (९ ऑक्टोबर) लग्न केले. तिने यूकेमध्ये असर मलिक यांच्यासोबत लग्न केले. मलालाचे पती असर याचे पाकिस्तान क्रिकेटशी घट्ट नाते आहे. ते एका क्रिकेट फ्रँचायझीचे मालकही आहेत. मलिक हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डात हाय परफॉर्मेंस केंद्राचे महाव्यवस्थापक आहेत. त्यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक क्रिकेट इव्हेंटचे फोटोही शेअर केले आहेत. मलाला आणि असर हे एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून ओळखत आहेत.
असरने यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर २०१९ मध्ये बर्मिंगहॅममध्ये क्रिकेट विश्वचषकादरम्यान एक ग्रुप फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये मलालाही त्याच्यासोबत पाकिस्तान संघाला प्रोत्साहन देताना दिसली होती. असरने मलालाला फोटोच्या कॅप्शनमध्ये टॅगही केले होते.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डात सामील होण्यापूर्वी असरची अमॅच्योर लीगमध्ये महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे त्यांची क्रिकेटमध्ये आवड वाढली. ते प्लेअर मॅनेजमेंट एजन्सीचे व्यवस्थापकीय संचालक होते आणि अमॅच्योर लीग लास्ट मॅन स्टँडमध्ये एका फ्रँचायझीचे मालक होते. त्यांनी पाकिस्तान सुपर लीग मुलतान सुलतान संघासोबत ऑपरेशनल मॅनेजर म्हणूनही काम केले होते. मुलतान सुलतानने २०२१ च्या हंगामाचे विजेतेपदही पटकावले होते.
मलालाने ट्विटरवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की ‘आजचा दिवस माझ्या आयुष्यातील खूप खास आहे, असर आणि माझे लग्न झाले आहे. आम्ही बर्मिंगहॅम येथील घरी आमच्या कुटुंबियांसोबत निकाह केला. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा. पुढच्या प्रवासात सोबत राहण्यास आम्ही उत्सुक आहोत,’ असे मलालाने म्हटले आहे.
मलालाने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तिचे पती असर, तिचे आई-वडील, झियाउद्दीन युसुफझाई आणि तूर पेकाई युसुफझाई दिसत आहेत.
Today marks a precious day in my life.
Asser and I tied the knot to be partners for life. We celebrated a small nikkah ceremony at home in Birmingham with our families. Please send us your prayers. We are excited to walk together for the journey ahead.
📸: @malinfezehai pic.twitter.com/SNRgm3ufWP— Malala Yousafzai (@Malala) November 9, 2021
मलाला युसुफझाईला २०१४ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार भारताचे बाल हक्क कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांच्यासोबत देण्यात आला. मलालाने गेल्या वर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयांत पदवी संपादन केली. मलाला आता २४ वर्षांची आहे आणि मुलींच्या शिक्षणासाठी काम करते. तिच्या मलाला फंडाने अफगाणिस्तानमध्ये दोन दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषक कोण जिंकणार? फाफ डू प्लेसिसने घेतली ‘या’ दोन संघांची नावे
टी२० विश्वचषक: इंग्लड-न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये ‘हे’ पाच खेळाडू बजावतील मुख्य भूमिका