बॅंगलोरमध्ये सुरु आसलेल्या आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाच्या( IPL 2022 Mega auction) पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंवर मोठ्या बोल्या लागल्या. यापैकीच एक म्हणजे वेगवान गोलंदाज दीपक चाहर( Dipak chahar). त्याच्या नशीबाने त्याला स्टार बनवले आहे. लिलावात दीपकला चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाने १४ कोटींमध्ये खरेदी केले आहे. चाहरने त्याची मुळ किंमत २ लाख रुपये एवढी ठेवली आहे. सीएसकेने त्याच्यावर त्याच्या मुळ किमतीच्या ७ पट जास्त बोली लावली. लिलावादरम्यान दीपकला खरेदी करण्यासाठी राजस्थान, दिल्ली संघानी सुद्धा बोली लावली होती. दीपकची बहिण मालती चाहरने त्याला मिळालेल्या या किंमतीवर आपली प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.
मालती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि क्रिकेट सामन्यांदरम्यान तिच्या भावाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्येही हजर असते. मालतीने तिच्या इंस्टाग्राम आकाऊंटवरुन लिलावादरम्यानचा दीपक खरेदी झाल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ती यावर खुश असल्याचे दिसत आहे.
मालतीने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “चेन्नई ही आहे आणि १४ कोटी… वाह… तू पूर्णपणे याच्या लायक आहेस.” मालतीची ही प्रतिक्रिया चाहत्यांना खूप आवडली आहे.
https://www.instagram.com/tv/CZ4G_eQDqlH/?utm_source=ig_web_copy_link
दीपकची होणारी पत्नी जया भारद्वाज हिने देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, “सीएसके आमच्यासाठी नेहमीच खास असेल.”
आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी दीपक बरोबरच ज्या वेगवान गोलंदाजांना सर्वाधिक रक्कम मिळाली, त्यामध्ये अनेक खेळाडूंचा समावेश आहे. शार्दुल ठाकूरला दिल्ली कॅपिटल्सने १०.७५ कोटींना विकत घेतले. गेल्या हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या हर्षल पटेलला आरसीबीने १०.७५ कोटींना विकत घेतले. प्रसिद्ध कृष्णाला राजस्थान रॉयल्सने १० कोटींना विकत घेतले. लॉकी फर्ग्युसनला गुजरात टायटन्सने १० कोटीला विकत घेतले. आवेश खानला लखनऊ सुपरजायंट्सने १० कोटींना, कागिसो रबाडाला पंजाब किंग्सने ९.२५ कोटींना, ट्रेंट बोल्टला रॉयल्सने ८ कोटीला, जोश हेझलवूडला आरसीबीने ७.७५ कोटीला आणि मार्क वुडला लखनऊ सुपरजायंट्सने ७.५० कोटींना विकत घेतले आहे.
लिलावादरम्यान सीएसकेने उथप्पाला २ कोटी आणि रायुडूला ६.७५ कोटींना खरेदी केले आहे. आतापर्यंत सीएसके संघात एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, केएम आसिफ, तूषार देशपांडे हे खेळाडू समाविष्ट झाले आहेत. आता लिलावाच्या दुसऱ्या दिवशी सीएसके संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आता चेन्नईजवळ २०.४५ कोटी शिल्लक आहेत. लिलावाच्या पहिल्या दिवशी चेन्नईने १० खेळाडू खरेदी केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मंकडींग आऊट झालेल्या बटलरकडूनच अश्विनचं राजस्थानमध्ये स्वागत, म्हणाला, ‘काळजी नको, मी क्रिजमध्येच
‘बेबी एबी’वर चॅम्पियन संघाने लावली बोली , डिविलियर्ससह ट्विटरवर आल्या अशा प्रतिक्रिया
आयपीएल ऑक्शन दोन परिवारांसाठी ठरला खास!! एकाच दिवशी केली तब्बल ४२.५ कोटींची कमाई