---Advertisement---

मलिकच्या बायकोने व्हॅनिटी व्हॅनमध्ये केले होते असे काही कांड, ज्याची चर्चा आजही….

On: शनिवार, जानेवारी 20, 2024 7:10 PM
Shoaib Malik sana javed
---Advertisement---

पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शोएब मलिक आणि भारताची महान टेनीसपटू सानिया मिर्झा यांच्यातील नातं अखेर तुटलं. सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असतानाच, शोएबने तिसरं लग्न केल्याचं समोर आलं आहे. शोएब मलिकने आज इंस्टाग्रामवर त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट केले. त्याची तिसरी पत्नी ही पाकिस्तानी अभिनेत्री आहे. सना जोवेद असं तिचं नाव असून, तिने पाकिस्तानी छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु तीची कारकिर्द प्रचंड वादग्रस्त राहिली.

20 जानेवारीला (शनिवार) सना आणि शोएबने त्यांच्या निकाहचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर टाकून त्यांच्या लग्नाची घोषणा केली आहे. फोटोंमध्ये शोएब आणि सना एकमेकांच्या प्रचंड प्रेमात असल्याचे दिसते.

शोएब मलिकने वेडींग फोटोंमध्ये व्हाइटीश क्रिम रंगाची शेरवानी घातली आहे. तर त्याची नवी नवरी सना जावेद पेस्टल ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. हा ड्रेस पाकिस्तानचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर हुसेन रेहारच्या कलेक्शनमधला आहे. या लेहेंग्याची किंमत पाकिस्तानी रुपयांमध्ये 3 लाख 79 हजार तर भारतीय चलनात याची किंमत 1 लाख 12 हजार इतकी आहे. लेहेंग्यासोबत हेवी ज्वेलरीने तिचा लुक कंप्लिट केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये दोघंही साइड हग करून पोज देत आहेत तर दुसऱ्या फोटोत शोएब त्याच्या नुकत्याच झालेल्या पत्नीच्या प्रेमात बुडालेला दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Malik (@realshoaibmalik) 

कोण आहे शोएब मलिकची नवी पत्नी
सना जावेद(sana javed) पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत ‘कहानी’, ‘ऐ मुश्त-ए-खाक’, ‘रोमियो वेड्स हीर’, ‘रुसवाई’, ‘डंक’ आणि ‘डर खुदा से’ सारख्या सीरियल्समध्ये काम केलं आहे. सध्या सना टीवी सीरियल ‘सुकून’मध्ये एनाची भूमिका करत आहे. सना जावेद 30 वर्षांची असून, तिचं देखील हे दुसरं लग्न आहे. याआधी तिने उमर जसवालसोबत लग्न केलं होतं.

विवादांशी सनाचं जुनं नातं
सनाबद्दल सांगायचं झालं तर, सनाला आधीपासूनंच अनेक विवादांनी घेरलेल आहे. ती ज्या इंडस्ट्रीत काम करते, त्या इंडस्ट्रीतल्या लोकांनासुद्धा ती आवडंत नाही. एकदा शोएबची पत्नी सना जावेद एक सुप्रसिद्ध पाकिस्तानी माॅडेल मनाल सलिमला ‘कौडीची किंमत नसलेली माॅडेल ‘ असं म्हणाली होती. सना जोवेदची अशी कमेंट लोकांना अजिबात आवडली नव्हती. या कमेंटवरून पाकिस्तानी सिनेसृष्टीतील अनेक लोकांनी तिला सुनावलेही होते.

यासोबतच पाकिस्तानी अभिनेत्री महनुर शेखनेही सना जावेदसोबत काम करतानाचा एक अनुभव शेअर केला होता. तिने सांगितले होते की, एकदा मेकअप व्हॅन शेअर केल्यामुळे सनाने खुप गोंधळ घातला होता. तिने पोस्ट शेअर करुन लिहिले होते की, “सर्वचजण सनासोबत काम करतानाचा त्यांचा अनुभव शेअर करत आहेत. मी काही चुकीचं नाही बोलणार पण ती खुप उद्धट आहे. ती कोणाचाही आदर करत नाही. ती खुप गर्विष्ठ आहे. मी जेव्हा तिच्यासोबत TVC केले होते, तेव्हा आम्ही 3 मुली होतो आणि एक मेकअप रुम होती. तर ती मोठ्याने ओरडुन म्हणाली की ,’या मुलींना बोहेर काढा,मी यांच्यासोबत काम करु शकत नाही.” या खुलाशामुळे पाकिस्तानच्या नेटिझन्सनेही सना जावेदला खुप ट्रोल केलं होतं.

सानियाने आधीच दिली होती डिओर्सची हिंट
सानिया मिर्झा आणि शोएब मलिकने 2010मध्ये लग्न केलं होतं. दोघांना एक मुलगाही आहे. मागच्या एका वर्षापासून शोएब आणि सानियाच्या नात्यात दूरावे आल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मध्यंतरी सानियाने त्यांच्या घटस्फोटाची चाहत्यांना थोडीशी हिंट दिली होती. तिने एक कोट पोस्ट केला होता. त्यात लिहिले होते की,”लग्नही कठीण आहे, घटस्फोट कठीण आहे. तुम्हाला तुमचं कठीण निवडायचं आहे.” परंतु सानियाने शोएबसोबतच्या घटस्फोटावर आणि सना जावेदबरोबरच्या शोएबच्या लग्नावर कोणतेही उघड भाष्य केलेले नाही.

महत्वाच्या बातम्या – 
Sania Mirza । शोएब मलिकने केलं तिसरं लग्न, दुसरी पत्नी सानिया मिर्झा म्हणाली….
तिसऱ्या लग्नासाठी शोएबने सानियाला दिला घटस्फोट! पण आता मुलागा इजहानचा कोण करणार सांभाळ?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---