fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

मानस धामणे, ऋतुजा चाफळकरसह इतर २५ खेळाडूंना पीएमडीटीए वार्षिक पुरस्कार प्रदान

पुणे। पीएमडीटीएच्या वार्षिक दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यांतील उत्कृष्ट टेनिस खेळाडू म्हणून कुमार राष्ट्रीय टेनिसपटू मानस धामणे आणि ऋतुजा चाफळकर यांना पीएमडीटीए-अरुण वाकणकर मेमोरियल पुरस्कार आणि अरुण साने मेमोरियल शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या पुरस्काराचे वितरण पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर करण्यात आले.

यावेळी पुण्यातील माजी आंतरराष्ट्रीय डेव्हिस कप प्रशिक्षक नंदन बाळ, डेव्हिस कूपर गौरव नाटेकर, संदीप किर्तने, नितीन किर्तने, अर्जुन कढे, फेड कप खेळाडू राधिका तुळपुळे-कानिटकर, अंकिता रैना आणि ऋतुजा भोसले यांना पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना( पीएमडीटीए)चे सभासदत्व प्रदान करण्यात आले.

पीएमडीटीए-अरुण वाकणकर मेमोरियल वार्षिक पुरस्काराचे वितरण पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील, एमएसएलटीएचे मानद सचिव व पीएमडीटीएचे उपाध्यक्ष सुंदर अय्यर, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ सुधीर भाटे, क्लबचे मानद सचिव आनंद परांजपे, पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे, भारताची अव्वल महिला टेनिसपटू अंकिता रैना, एमएसएलटीएचे उपाध्यक्ष प्रशांत सुतार, नंदन बाळ, अपर्णा वाकणकर आणि आशा साने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

तसेच, याशिवाय जिल्ह्यांतील 2018च्या यादीत विविध वयोगटात अव्वल क्रमांक पटकावलेल्या नमिश हूड, तेज ओक, प्रिशा शिंदे, पार्थ देवरूखकर, श्रावणी देशमुख, आर्यन कोटस्थाने, अवंती राळे यांना याप्रसंगी अरुण वाकणकर मेमोरियल पदक आणि शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, याप्रसंगी नुकत्याच पार पडलेल्या पीएमडीटीए जुनियर टेनिस लीग स्पर्धेतील विजेत्या विपार स्पिडिंग चिताज संघाला करंडक प्रदान करण्यात आला.

जिल्ह्यांतील २०१८ची खेळाडूंची वार्षिक मानांकन यादी खालीलप्रमाणे:

8 वर्षाखालील मिश्र गट-1. नमिश हुड, 2. रित्सा कोंदकर, 3. आर्यन किर्तने, 4. निरज जोरवेकर, 5. सुजय देशमुख

10 वर्षाखालील मुले- 1. तेज ओक, 2. अमोघ दामले, 3. सुर्या काकडे, राज दर्डा, 5. सक्षम भन्साली

10 वर्षाखालील मुली- 1. प्रिशा शिंदे, 2. मृणाल शेळके, 3. हृितीका कापले, 4. मेहेक कपुर, 5. काव्या देशमुख

12 वर्षाखालील मुले- 1. पार्थ देवरूखकर, 2. अर्जुन किर्तने, 3. श्लोक गांधी, 4. केयुर म्हेत्रे, 5. अर्णव पापरकर

12 वर्षाखालीली मुली- 1. श्रावणी देशमुख, 2. अलिना शेख, 3. सिमरन छेत्री, 4. रितीका मोरे, 5. सानिका लुकतुके

14 वर्षाखालील मुले- 1. आर्यन कोठस्थाने, 2. इशा देगमवार, 3. आर्यन हुड, 4. निशित रहाणे, 5. अनमोल नागपुरे

14 वर्षाखालील मुली- 1.अवंती राळे, 2. श्रावणी देशमुख, 3. कश्यपी महाजन, 4. इशीका राजपुत, 5. याशिका बक्षी

You might also like