काल झालेल्या सामन्यात मँचेस्टर सिटीने क्रिस्टल पॅलेस संघाला धूळ चारत ५-० असा विजय मिळवला. या विजयात इब्राहीम स्टर्लिंग याने दोन गोल तर साने, सिर्गिओ अग्वारो आणि फेबियन डाल्फ याने एक -एक गोल नोंदवला. या विजयासह इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये मँचेस्टर सिटी गोलफरकाच्या जोरावर पहिल्या क्रमांकावर विराजमान झाली आहे.
पहिल्या सत्रात दोन्ही संघाकडून आक्रमणे चालू होते. यात दोन्ही संघात यश येत नव्हते. सामन्यात पहिला गोल होण्यासाठी ४४ व्या मिनिटापर्यंत वाट पाहावी लागली. सिल्वा कडून मिळलेल्या पास वर साने याने उत्तम गोल केला. दुसरऱ्या सत्रात सिटी संघाची आक्रमणे आणखी वाढली. इब्राहिम स्टर्लिंग आणि साने यांनी चाल रचली आणि सानेने स्टर्लिंग साठी बॉल इन केला त्यावर स्टर्लिंगने गोल करत सिटी संघाची आघाडी २-० अशी केली. त्यावर अवघ्या आठमिनिटात स्टर्लिंगने आणखी एक गोल करत आघाडी ३-० अशी केली.
मँचेस्टर सिटीचा मुख्य खेळाडू सिर्गिओ अग्वारो याने सामना सम्पन्यास ११ मिनिटे शिल्लक असताना सिटीचा चौथा गोल करत आघाडी ४-० अशी केली. यानंतर सिटीसाठी बदली खेळाडू म्हणून आलेल्या फेबियन डाल्फ याने अप्रतिम गोल करत सिटीची आघाडी ५-० अशी केली. क्रिस्टल पॅलेस संघ या सामन्यात देखील गोल करू शकला नाही.
यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-
#१ अर्जेन्टिना आणि मँचेस्टर सिटीचा स्ट्रायकर सिर्गिओ अग्वारो याने मँचेस्टर सिटी संघासाठी १७६ गोल केले आहेत. त्याने आणखी एक गोल केला तर तो मँचेस्टर सिटी साठी सर्वाधिक गोल करणाऱ्या इरिक ब्रूक यांच्या विक्रमाची बरोबरी करेल. त्याने आणखी दोन गोल केले तर मँचेस्टर सिटी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनेल.
#२मँचेस्टर सिटी आणि मँचेस्टर युनाइटेड या दोन्ही संघाचे आहे सामन्यात पाच विजयसह १६ गुण आहेत. परंतु गोल फरकाच्या जोरावर मँचेस्टर सिटी इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान झाली आहे.
#३ कोणत्याही संघाला नकोसा वाटणारा खूप मोठा विक्रम क्रिस्टल पॅलेस या संघाच्या नावावर झाला आहे. इपीएल मध्ये सुरुवातीचे सलग सहा सामने एकही गोल न करता हारण्याचा नवीन विक्रम या संघाने केला आहे.