एफए कपच्या सामन्यात झालेला पराभव आणि त्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडायची नामुष्की आलेल्या प्रिमियर लीगच्या विजेतेपदावर आपले नाव कोरण्यापासून अवघे काही पाऊल दूर असलेल्या मॅन्चेस्टर सिटीने काल कॅरोबाओ कपच्या अंतिम सामन्यात अर्सेनलवर ३-० ने विजय मिळवत या मौसमातील आपले पहिले विजेतेपद पटकावले.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच मॅन्चेस्टर सिटीने आपली पकड मजबूत ठेवली. सामन्याच्या १८ व्या मिनिटला सिटीचा गोलकीपर ब्रावोच्या गोलकीकवर ॲगुवारोने बाॅल पोस्टमध्ये टाकत १-० ची महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. या गोलबरोबरच ॲगुवारोचे अर्सेनल विरुद्ध मागील पाच सामन्यात पाच गोल झाले. या गोल बरोबरच ॲगुवारोचे सिटीसाठी १९९ गोल्स पूर्ण झाले आहेत.
पहिला हाफ १-० ने सुटल्यानंतर दुसऱ्या हाफला अजून एक गोल करून सामना खिशात घालण्याच्या प्रयत्नाला अर्सेनलच्या डिफेंडर्सनेच मदत केली. ५८ व्या मिनिटला गुंडोगनच्या फटक्याला दिशा दाखवत कंम्पनीने २-० ची बढत घेतली.
६५ व्या मिनिटला डेव्हिड सिल्वाने गोल करत सामन्याचा निकाल केवळ औपचारिकतेपुरता ठेवला. या बरोबरच हा कप पाचव्यांदा आपल्या नावे केला तर मागील ५ वर्षात तीनदा (२०१४,२०१६,२०१८) आपल्या नावे केला.
अर्सेनलचे प्रदर्शन खूप निराशाजनक ठरले त्यांच्या संघातील सर्व खेळाडूंनी मिळून एकमेव गोलची संधी निर्माण केली. तर सिटीसाठी त्यांच्या गोलकीपरने सुद्धा एक संधी निर्माण केली.
सिटीचा मॅनेजर पेपचेहे २२ वे विजेतेपद होते तर मॅन्चेस्टर सिटीसोबतचे हे पहिले मोठे विजेतेपद आहे.