प्रिमीयर लीगच्या पहिल्याच सामन्यात मॅंचेस्टर युनायटेडने लेस्टर सिटीचा २-१ असा पराभव करत हंगामाची विजयी सुरूवात केली आहे.
फिफा विश्वचषक विजेत्या संघातील पॉल पोग्बाने सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला पेनाल्टी शॉटवर गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. पहिले सत्र संपले असता युनायटेड १-० अशी आघाडीवर होती.
दुसऱ्या सत्राच्या ८३व्या मिनिटाला २३ वर्षीय ल्युक शॉने संघासाठी दुसरा गोल करून संघाचा विजयाचा मार्ग मोकळा केला. मात्र सिटीच्या जॅमी वॅर्डीने अतिरीक्त वेळेत गोल करत सामना २-१ असा आणला.
८४व्या मिनिटाला पोग्बाच्या जागी मॅरौने फेलानी याला मैदानावर बोलावण्यात आले.
“पोग्बा हा उत्कृष्ठ खेळाडू असून मला त्याला जास्तीत जास्त सामन्यात खेळवायचे आहे. आम्हांला वाटले तो फक्त ६० मिनिटे खेळेल पण तो ८० मिनिटे मैदानावर होता हे चांगले आहे”, असे युनायटेडचे मॅनेजर जोस मॉरीन्हो म्हणाले.
“क्लब बदलण्याचा निर्णय हा पोग्बालाच घ्यायचा अाहे. पण तो क्लबकडून खेळणार हे त्याने स्पष्ट केले आहे”,ट्रान्सफर विंडोमध्ये पोग्बा बार्सिलोनाशी संपर्कात होता याची चर्चा होत होती यावर स्पष्टीकरण देताना मॉरीन्हो म्हणाले.
यावेळी सामनावीराचा पुरस्कार पोग्बाला मिळाला. तसेच युनायटेडचा पुढील सामना १९ ऑगस्टला ब्रिंगटन विरुद्ध असणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–लाॅर्ड्स कसोटीत बॅट न चाललेल्या कोहलीचा एक खास विक्रम
–क्रिकेटची पंढरी- वानखेडे स्टेडियमचा हा इतिहास आपणास नक्कीच जाणुन घ्यायला आवडेल!