भारतात होणाऱ्या अंडर १७ विश्वचषकाचे वेड अवघ्या जगाला लागले आहे. ही स्पर्धा या अर्थाने खूप मोठी आहे की या स्पर्धेतून उद्याचे सुपरस्टार खेळाडू आपणाला मिळणार आहते. रोनाल्डिन्हो, आंद्रे इनिएस्टा, नेमार जुनियर असे एकापेक्षा एक सरस खेळाडू अंडर १७ विश्वचषक स्पर्धेमुळे प्रकाश झोतात आले आणि फुटबॉल विश्वातील तारे झाले.
आपणाला वाटत असेल की हे सर्व विदेशी खेळाडूंसाठीच होत असते . भारतीय खेळाडूंना अश्या स्पर्धेतून प्रसिद्धी आणि मोठ्या क्लबकडून करारबद्ध होणे अश्या गोष्टी स्वप्नवत आहेत. पण हे एकदम चूक आहे. कारण जगभरातील सर्वात श्रीमंत क्लबपैकी एक मँचेस्टर युनिटेड क्लब भारतीय संघातील खेळाडूंवर लक्ष ठेऊन आहे. बंगाली दैनिक आजकल यांच्या बातम्यांनुसार मॅन युनाइटेड क्लब भारतीय संघातील मुख्य फॉरवर्ड कोमल थाटल या खेळाडूवर विशेष लक्ष ठेऊन आहे.
कोमल थाटल हा भारतीय संघाचा मुख्य खेळाडू आहे. भारतीय संघ गोल करण्यासाठी बऱ्याच वेळा कोमलवर अवलंबून असतो. कोमल त्याच्या ड्रिब्लिंग स्किल आणि गोल करण्याच्या क्षमतेसाठी खूप प्रसिद्ध आहे. युरोपीय दौऱ्यात त्याने अनेक मोठ्या क्लब विरुद्ध आणि देंशांविरुद्ध गोल केले आणि तो प्रकाश झोतात आला. मागील तीन वर्षांपासून कोमल भारतीय ज्युनियर संघाचा मुख्य भाग आहे. त्याने मागील युरोपीय दौऱ्यात त्याने ब्राझील आणि इटली सारख्य देशांविरुद्ध गोल लगावले आहे.
भारतीय संघाच्या यूरोपीय दौऱ्यात त्याने उत्तम कामगिरी केली तेव्हापासून मोठे क्लब त्याच्यावर लक्ष ठेऊन आहे. त्यात मँचेस्टर युनाइटेड क्लब सर्वात पुढे आहे. मँचेस्टर युनाइटेड क्लबने त्याचा विश्वचषकातील खेळ पाहण्यासाठी एक टीम भारतात पाठवण्याचे ठरवले आहे. मॅन युनाइटेड क्लब जगभरातून नवीन प्रतिभावान खेळाडू शोधण्यासाठी आणि त्यांना घडवण्यासाठी सर्वात अग्रेसर असतो. याचे सर्वात मोठे उदाहरण द्यायचे झाले तर तो म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो.
यदाकदाचित आपणास माहित नसेल तर…
# कोमल थाटल खरा प्रकाश झोतात आला तो त्याने अंडर १७ ब्रिक्स कपमध्ये केलेल्या ब्राझील विरुद्धच्या सोलो गोलमुळे. या गोळमुळे त्याचे अनेक स्थरावरून कौतुक झाले. हा सामना भारतीय संघाने १-३ असा गमावला होता.
# कोमल थाटल हा भारतीय संघासाठी जर्सी १० नंबर परिधान करतो.
# युरोपीय दौऱ्यातील भारतीय अंडर १७ संघाची सर्वात मोठे यश म्हणजे इटली विरुद्धचा २-० असा विजय. या विजयात देखील कोमल थाटल याने गोल नोंदवला होता.