भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाबचा फलंदाज मनदीप सिंग हा बाबा बनला आहे. त्याची पत्नी जगदीप जैस्वाल हिने शनिवारी (१६ जानेवारी) गोंडस मुलाला जन्म दिला आहे. याबद्दल मनदीपने सोशल मीडियाद्वारे सर्वांना माहिती दिली आहे.
मनदीपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत लिहिले की, ‘तो या जगात आल्याने आमचे जीवन खूप अप्रतिम बनले आहे. आमचा राजकुमार राजवीर सिंग याच्या आगमनाने मी आणि जगदीप खूप आनंदी झालो आहोत.’
How wonderful life is now that he’s here 💙 Me & Jagdeep are extremely happy to announce the arrival of our little prince, RAJVEER SINGH 💙 Born 16 January 2021 🧿 pic.twitter.com/j3n9mHyiRO
— Mandeep Singh (@mandeeps12) January 16, 2021
पंजाब संघाला जिंकून दिले सलग ४ सामने
उजव्या हाताचा फलंदाज मनदीप हा सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेतील पंजाब संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली पंजाब संघाने एलिट ग्रुप ए मध्ये १६ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. उत्तर प्रदेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ११ धावांनी विजय मिळवत पंजाबने हंगामाची दणदणीत सुरुवात केली. त्यानंतर दुसरा सामना कर्नाटकविरुद्ध झाला असून या सामन्यात त्यांनी कर्नाटकला ७ विकेट्सने नमवले.
तर रेल्वे संघाविरुद्धच्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात त्यांनी ११७ धावांनी शानदार विजय मिळवला. तसेच नुकत्याच जम्मू आणि काश्मिर विरुद्ध पार पडलेल्या चौथ्या सामन्यातही पंजाबने विजयी पताका झळकावली आहे.
मनदीपची क्रिकेट कारकिर्द
२९ वर्षीय मनदीप सिंगने आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्त्व केले आहे. आजवर आयपीएलमध्ये त्याने एकूण १०४ सामने खेळले असून १६५९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ६ अर्धशतकांचा समावेश आहे.
भारतीय क्रिकेट संघाकडून अधिक सामने खेळण्याची संधी त्याला मिळाली नाही. जून २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध त्याने भारतीय टी२० संघात पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला केवळ २ सामन्यात संधी मिळाली. यादरम्यान ५२ धावांच्या सर्वोच्च खेळीसह त्याने ८७ धावा केल्या होत्या.
पाच वर्षांपुर्वी बांधली होती लग्नगाठ
आपली प्रेयसी जगदीप जैस्वाल हिला काही वर्षे डेट केल्यानंतर जवळपास पाच वर्षांपुर्वी मनदीपने तिच्याशी लग्न केले होते. २५ जानेवारी २०१६ रोजी फगवारा येथील राहत्या घरी त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘भारतीय संघात खराब शॉट खेळून बाद होण्याची स्पर्धा सुरू आहे का?’ पंत बाद झाल्यानंतर चाहत्यांचा प्रश्न
‘या’ भारतीयांचा कसोटी पदार्पणात नुसता धुराळा; केला ३ विकेट्स आणि अर्धशतक करण्याचा पराक्रम
तळातील क्रमांकावर फलंदाजीला येत विरोधी संघाला धू धू धुणारे भारतीय कसोटी पदार्पणवीर, सुंदरचाही समावेश