---Advertisement---

तळातील क्रमांकावर फलंदाजीला येत विरोधी संघाला धू धू धुणारे भारतीय कसोटी पदार्पणवीर, सुंदरचाही समावेश

On: रविवार, जानेवारी 17, 2021 2:52 PM
---Advertisement---

आघाडीचे सहा फलंदाज माघारी परतल्यानंतर लवकरच भारताचा पहिला डाव आटोपून मोठी आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऑस्ट्रेलियाला चांगली चपराक बसली. पदार्पणवीर वॉशिंग्टन सुंदर याने शार्दूल ठाकूरसोबत मिळून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना धू धू धुतले. यावेळी ५० हून अधिक धावा करत त्याने नवा विक्रम केला आहे.

भारतीय संघाच्या पहिल्या डावात सुंदर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. आपला संघ ६ बाद १८६ धावांवर असल्यामुळे त्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता विकेट वाचवून अधिकाधिक धावा जमा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने १४४ चेंडूत ४३.०६च्या स्ट्राईक रेटने ६२ धावा केल्या. दरम्यान त्याने १ षटकार आणि ७ चौकार ठोकले. पुढे मिचेल स्टार्कच्या चेंडूवर कॅमरॉन ग्रीनने झेल पकडत सुंदरला माघारी धाडले.

असे असले तरीही, पदार्पणाच्या कसोटी डावात सातव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजीला येत मायदेशाबाहेर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या विक्रमाच्या यादीत माजी भारतीय कसोटीपटू राहुल द्रविड अव्वलस्थानी आहे. द्रविडने १९९६ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. या सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ९५ धावांची खेळी केली होती.

याव्यतिरिक्त माजी भारतीय दिग्गज दत्तू फाडकर आणि भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्या यांच्या नावेही या विक्रमाची नोंद आहे. फाडकर यांनी १९४७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तळातील क्रमांकावर फलंदाजी करताना ५१ धावा केल्या होत्या. तर पंड्याने २०१७ मध्ये श्रीलंकाविरुद्ध ५० धावांची खेळी केली होती.

ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावाखेर ३३ धावांनी आघाडीवर

ऑस्ट्रेलिया आणि भारत संघातील ब्रिस्बेन कसोटी सामन्याच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, भारताचा पहिला डाव ३३६ धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी मिळवली आहे. आता ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मार्कस हॅरीस आणि डेविड वॉर्नर हे सलामीला फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Test Live : भारताच्या शेपटाचा ऑसी गोलंदाजांना तडाखा, भारताचा पहिला डाव ३३६ धावांवर संपुष्टात

गोलंदाजीनंतर फलंदाजीतही शार्दुलचा दे घुमा के! इरफान-अश्विनच्या ‘त्या’ विक्रमाची केली बरोबरी

सुटला असता ना भावा! पहिल्यांदा चेंडू हातून निसटला तरीही स्मिथने पकडला अप्रतिम झेल, बघा व्हिडिओ   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---