भारताने न्यूझीलंड विरुद्धच्या सुरू असलेल्या टी२० सामन्यांची मालिका जिंकली आहेत. या मालिकेतील पहिले तिन्ही सामने भारताने जिंकले असून चौथ्या सामन्यात मात्र पराभूत व्हावे लागले. या पराभवानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवला पत्रकार परिषदेत भारताने एक फलंदाज का कमी खेळवला गेला असा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाचे त्याने उत्तर देताना एक महत्वाची बाब सांगितली.
सूर्यकुमारच्या म्हणण्यानुसार, संघ सहा फलंदाजासोबत खेळणार होता. चौथ्या सामन्यात मात्र इशान किशनला वगळून श्रेयस अय्यरला घेण्याऐवजी अर्शदीप सिंगला संधी दिली गेली. त्याच्या या निर्णयावर तो म्हणाला, “आम्ही मुद्दामच सहा फलंदाजासह खेळण्याचा निर्णय घेतला होता. आमचे लक्ष्य पाच गोलंदाजासह स्वत:ला आव्हान देण्याचे काम होते.”
“टी२० विश्वचषकामुळे अधिक खेळाडूंना संधी देण्याचा विचार आहे. आमच्याकडे असे काही खेळाडू होते ज्यांना या सामन्यात संधी देता आली असती, मात्र जे विश्वचषकासाठी निवडले गेले त्यांचा विचार करावा लागला. तसेच आम्ही प्रथम फलंदाजी करताना चांगली कामगिरी करत होतो, आता मात्र आम्हाला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या दोन-तीन विकेट्स पडल्यावर कशी फलंदाजी होते हे पाहायचे होते,” असेही सूर्यकुमारने पुढे म्हटले.
भारताचा आगामी टी२० विश्वचषकाचा संघ पाहिला तर यामध्ये श्रेयसला वगळले आहे. त्याला न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी तिलक वर्मा दुखापतग्रस्त होता म्हणून निवडले गेले होते. चौथ्या सामन्यात भारताच्या कामगिरीबाबत बोलताना सूर्यकुमार म्हणाला, “एक-दोन भागीदाऱ्या उत्तम झाल्या असत्या तर सामन्याचा निकाल वेगळाच असता. अजून एका मोठ्या भागीदारीने फरक पडला.”
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ विकेट्स गमावत २१५ धावसंख्या केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात अडखळत झाली. यामध्ये शिवम दुबेने सर्वाधिक ६५ धावा (२३ चेंडू) केल्या होत्या. हा सामना भारताने ५० धावांनी गमावला.






