---Advertisement---

Pakistan vs Netherlands: त्याच्यात षटकार मारण्याची ताकदच नाही..’, भारतीय दिग्गज खेळाडूने उडवली बाबर आझमची खिल्ली!

On: शनिवार, फेब्रुवारी 7, 2026 7:00 PM
Babar-Azam
---Advertisement---

पाकिस्तानच्या संघाने टी-20 विश्वचषक 2026 च्या पहिल्या सामन्यात 3 गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात पाकिस्तानचा संघ एका क्षणी पराभवाच्या उंबरठ्यावर होता, पण शेवटच्या षटकांमध्ये फहीम अशरफने बाजी पलटवून संघाला विजय मिळवून दिला. मात्र, पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम (Babar Azam) या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला. बाबरने 18 चेंडूत केवळ 15 धावा केल्या, ज्यात फक्त एका चौकाराचा समावेश होता. नेदरलँड्सविरुद्धच्या या सुमार कामगिरीनंतर त्याच्या क्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

कमेंट्री दरम्यान टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने (Mohmmed kaif on Babar Azam) बाबरच्या शॉट मारण्याच्या शैलीवर शंका उपस्थित करत त्याची मजा घेतली.

बाबर आझम नेदरलँड्सविरुद्ध पुढे येऊन षटकार मारण्याच्या नादात झेलबाद झाला. यावर कैफ म्हणाला, तुम्ही म्हणालात षटकार मारा, पण कुठे मारता आला? फिल्डर मागेच उभा आहे. मुळात षटकार मारणे ही त्याची ताकद नाहीच. त्याची स्टाईल षटकार मारण्याची नाही, तर प्रत्येक चेंडूवर धाव काढून सामना जिंकण्याची आहे. जिथे तो मोठा शॉट मारायला गेला, तिथे तो आऊट झाला.

टी-20 क्रिकेटमधील बाबरच्या खेळण्याच्या पद्धतीवर सतत टीका होत असते. त्याचा स्ट्राईक रेट नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 140 सामन्यात बाबरचा स्ट्राईक रेट केवळ 128 चा आहे. नुकत्याच पार पडलेल्या बिग बॅश लीगमध्येही त्याचे प्रदर्शन लाजीरवाणे होते. 11 सामन्यांत त्याने 103 च्या स्ट्राईक रेटने फक्त 202 धावा केल्या होत्या, तर त्याची सरासरी 22.44 होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---