अभिनेत्री अथिया शेट्टीने शुक्रवारी (०५ नोव्हेंबर) आपला २९ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटपटू केएल राहुलने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट केली. या पोस्टद्वारे त्याने अथियासोबतचे नाते अधिकृत केले आहे. केएल राहुलने अथियासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. यात एका क्रिकेटपटूच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अथियाने ५ नोव्हेंबरला तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी इंडस्ट्रीतील सर्व कलाकारांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. मात्र, सर्वांचे लक्ष वेधून घेणारी पोस्ट केएल राहुलने केली होती. केएल राहुलने इंस्टाग्रामवर स्वतःचा आणि अथियाचा एक फोटो शेअर केला आणि त्यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अथिया.; यामध्ये त्याने लव्ह इमोजीचाही समावेश केला होता. यानंतर त्याच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला.
https://www.instagram.com/p/CV5yrGOA0Fh/?utm_source=ig_web_copy_link
अशातच क्रिकेटपटू मनदीप सिंगने ‘हॅप्पी बर्थडे भाभीजी,’ असे लिहून धमाल उडवून दिली. त्याच्या या कमेंटमुळे राहुल आणि अथिया यांच्या नात्याला दुजोरा मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी अथिया शेट्टी केएल राहुलसोबत इंग्लंडमध्ये होती आणि तिथून तिने खूप फोटो शेअर केले होते. याआधीही दोघे अनेक फोटोंमध्ये दिसले होते, पण अथियाचे वडील सुनील शेट्टी यांनी सांगितले होते की, अथिया तिचा भाऊ अहान शेट्टीसोबत इंग्लंडला गेली होती.
माध्यमांतील वृत्तांनुसार, जेव्हा केएल राहुल इंग्लंडमध्ये त्याच्या मालिकेसाठी निघाला, तेव्हा त्याने अथिया शेट्टीला सोबत घेतले होते. इंग्लंडला जाण्यापूर्वी बीसीसीआयसोबतच्या संभाषणात केएल राहुलने अथिया शेट्टीला त्याची गर्लफ्रेंड म्हटले होते. यादरम्यान विमानतळावरील प्रत्येक खेळाडूला तो ज्या साथीदारासोबत प्रवास करत होता, तेव्हा त्याला तिचे नाव सांगावे लागले होते. राहुलने अथिया शेट्टीचे जोडीदार म्हणून नाव सांगितले होते.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल मिळून एका आंतरराष्ट्रीय ब्रँडची जाहिरात करतात. यावर सुनील शेट्टीना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले होते की, ‘मला वाटते की तुम्ही त्याच्याशी याविषयी बोलले पाहिजे, कारण या दोघांची निवड ब्रँडने त्यांच्या प्रचारासाठी केली आहे आणि मला वाटते की ते एकत्र छान दिसतात.’
अथिया शेट्टी, शेवटची पडद्यावर नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘मोतीचूर चकनाचूर’मध्ये दिसली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुजीबसाठी भारतीयांनी देव ठेवले पाण्यात; ट्विटरवर होतोय ट्रेंड
-भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणतोय, “विराट बुर्ज खलिफा, तर धोनी बुर्ज अल अरब”
-‘बुमराह असावा भारताचा पुढील कर्णधार’; ‘हे’ कारण देत दिग्गजाने वाढवली यादी






