अनेक वर्षे देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळल्यानंतर आता कर्णधार मंदीप सिंगनं (Mandeep Singh) मोठा निर्णय घेतला आहे. त्यानं पंजाब सोडून त्रिपुरासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मंदीपनं एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. तो म्हणाला की तो ज्युनियर ते वरिष्ठ स्तरापर्यंत पंजाब संघाचा सतत भाग होता पण आता नवीन अध्याय सुरू करण्याची वेळ आली आहे.
मंदीप सिंगबद्दल बोलायचं झालं, तर तो एक पंजाबी क्रिकेटर आहे आणि त्याने आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात पंजाबसाठीच केली होती. मंदीपनं आतापर्यंत 99 प्रथम श्रेणी सामने आणि 131 लिस्ट ए सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं दोन्ही फॉरमॅटमध्ये जवळपास 4 हजार धावा केल्या आहेत. मंदीपनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023-24 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली पंजाबसाठी ट्रॉफी जिंकली होती. त्याच्या नावावर ही मोठी उपलब्धी आहे.
मंदीप सिंग (Mandeep Singh) म्हणाला की, पंजाब क्रिकेट असोसिएशनमधील माझा प्रवास खूप संस्मरणीय होता. याशिवाय 2023-24 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कर्णधार म्हणून विजेतेपद पटकावण्याचा मानही मिळाला होता. मी पीसीए सचिव, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. खूप विचार केल्यानंतर मी ठरवलं आहे की, आता माझ्यासाठी नवीन सुरुवात करण्याची वेळ आली आहे. आगामी देशांतर्गत हंगामात मी आता त्रिपुरासाठी खेळणार असल्याचे मी ठरवलं आहे. त्रिपुरामध्ये नवीन इनिंग सुरू करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. मला अनेक यश मिळवायचे आहेत.
मंदीप सिंगच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं भारतासाठी 2016 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टी20 मालिकेत पदार्पण केलं होतं. त्यानं भारतासाठी 3 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 43.50च्या सरासरीनं 87 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 119.17 राहिला. तर त्याची सर्वोच्च धावसंंख्या नाबाद 52 राहिली. टी20 आंतरराष्ठ्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 1 अर्धशतक आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सायना नेहवालचे जसप्रीत बुमराहला चॅलेंज! म्हणाली, “तो माझ्या स्मॅशसमोर टिकू शकणार नाही”
2025च्या आयपीएल हंगामात पुनरागमन करणार ‘हे’ 3 धुरंधर?
उपांत्यपूर्व सामना 1-1 ने बरोबरीत राहूनही पराभूत झाली रितिका! काय आहे नियम?