भारताची महिला क्रिकेटपटू स्म्रीती मानधना सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेली किया सुपर लीग गाजवत आहे. तिने रविवारी, 5 आॅगस्टला या लीगमधील दुसरे अर्धशतक झळकावले आहे.
तिने हे अर्धशतक वेस्टर्न स्ट्रोम संघाकडून खेळताना यॉर्कशायर डायमंड्स विरुद्ध केले आहे. तिने या सामन्यात यॉर्कशायर संघाने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 36 चेंडूत 56 धावा केल्या आहेत. यात तिने 5 चौकार आणि 3 षटकार मारले.
WESTERN STORM WIN BY 7 WICKETS – What a run chase!!!!!!!!!!!!!#StormTroopers pic.twitter.com/ObsjbxEArM
— Western Storm (@_WesternStorm) August 5, 2018
तसेच तिने या सामन्यात रचेल प्रीस्टबरोबर सलामीला 101 धावांची शतकी भागिदारी रचली. रचेलने 37 धावा केल्या. या दोघी बाद झाल्यावर हीथर नाइटने नाबाद 45 धावा करत वेस्टर्न स्ट्रोमच्या विजयात हातभार लावला.
वेस्टर्न स्ट्रोमने या तिघींच्या खेळीच्या जोरावर 7 विकेटने विजय मिळवला.
तत्पुर्वी यॉर्कशायर डायमंड्सने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 172 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून बेथ मुनीने सर्वाधिक 69 धावा केल्या.
स्म्रीती या लीगमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असून ती यावर्षी या लीगमधील आत्तापर्यंत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे. तिने आत्तापर्यंत 6 सामन्यात अनुक्रमे 48, 37, 52*, 43*, 102 आणि 56 अशा मिळूण 338 धावा केल्या आहेत.
विशेष म्हणजे ती वेस्टर्न स्ट्रोमकडून एका मोसमात सर्वाधिक धावा करणारीही फलंदाज ठरली आहे. या आधी 2016 मध्ये स्टीफनी टेलरने तर 2017 मध्ये रचेल प्रीस्टने वेस्टर्न स्ट्रोमकडून अनुक्रमे सर्वाधिक 289 आणि 261 धावा केल्या होत्या.
याबरोबरच या लीगमध्ये यावर्षी आत्तापर्यंत तिने केलेले हे खास विक्रम-
सर्वाधिक धावा – 338 धावा
सर्वाधिक सरासरी – 84.50
सर्वाधिक स्ट्राइक रेट – 183.69
सर्वाधिक 50 पेक्षा जास्त धावा – 3 वेळा
सर्वोच्च वयक्तीक धावसंख्या – 61 चेंडूत 102 धावा (या स्पर्धेत यावर्षी हे एकमेव शतक आत्तापर्यंत झाले आहे.)
सर्वाधिक चौकार – 34 चौकार
सर्वाधिक षटकार – 16 षटकार
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–ड्रिंक्स ब्रेक- क्रिकेट सामन्यात थेट रिक्षाच आली पाणी घेऊन
–पुजारा टीम इंडियात हवा की नको? सेहवागने विचारला चाहत्यांना प्रश्न
–वनडे-कसोटी क्रमवारीत एकाच वेळी अव्वल स्थानी विराजमान होणारे टाॅप ५ खेळाडू