पुणे। फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 16वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात पियुश जाधव, आशुतोष कवडेकर, अद्विक नाटेकर यांनी तर, मुलींच्या गटात ध्रुवा माने, आर्या शिंदे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात बिगरमानांकीत ध्रुवा मानेने दुसऱ्या मानांकित ईश्वरी मार्कंडेचा 6-4, 6-3 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. आर्या शिंदेने आठव्या मानांकित दुर्गा बिराजदारचा 6-0, 1-6, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.
मुलांच्या गटात बिगरमानांकीत अद्विक नाटेकर याने सातव्या मानांकित देवेंद्र कुलकर्णीचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. आशुतोष कवडेकरने पाचव्या मानांकित आदित्य आयंगरचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(3) असा पराभव केला. पियुश जाधवने सहाव्या मानांकित स्वराज ढमढेरेचा 6-2, 6-3 असा सहज पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली.
निकाल: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी): मुले:
लक्ष गुजराथी[1] वि.वि.साहिल कोठारी 6-2, 6-2;
अनुज तशीलदार वि.वि.क्रिशांक जोशी 3-6, 6-1, 7-5;
अवनीश चाफळे वि.वि.शिवम पडिया 6-3, 6-2;
अद्विक नाटेकर वि.वि.देवेंद्र कुलकर्णी[7] 6-3, 6-2;
अमोघ दामले वि.वि.देव तुराकिया 6-2, 6-1;
आशुतोष कवडेकर वि.वि.आदित्य आयंगर[5] 6-3, 7-6(3);
अर्चित धूत[8] वि.वि.कौशिक कोठा 6-2, 6-1;
पियुश जाधव वि.वि.स्वराज ढमढेरे[6] 6-2, 6-3;
ओमकार शिंदे वि.वि.मनन अगरवाल 6-1, 6-3;
राघव अमीन[3] वि.वि.शार्दूल खवळे 6-1, 6-1;
मुली:
श्रीया साई[1] वि.वि.आर्या हिरे 7-6(4), 6-3;
श्रावणी देशमुख वि.वि.काव्या देशमुख 6-4, 6-2;
रिद्धी शिंदे[7] वि.वि.श्रेया होनकन 6-3, 6-0;
आर्या शिंदे वि.वि.दुर्गा बिराजदार[8] 6-0, 1-6, 6-4;
भक्ती ताजने वि.वि.जान्हवी चौगुले 6-0, 6-1;
ध्रुवा माने वि.वि.ईश्वरी मार्कंडे[2] 6-4, 6-3.