भारतासाठी टेबल टेनिसमधून क्रीडा प्रकारातून चांगली बातमी येत आहे. टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये रविवारी (२५ जुलै) भारत आणि युक्रेन संघात टेबल टेनिसचा एकेरी गटातील दुसरा राऊंड पार पडला. यामध्ये भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्राने शानदार प्रदर्शन करत मार्गारेटा पेसोत्स्कावर ४-३ ने दणदणीत विजय मिळवला आहे.
मनिकाची गाडी पहिल्या दोन सेटमध्ये ०-२ अशी होती. मात्र, तिने चांगले पुनरागमन करत सलग २ सेट जिंकले. त्यानंतर पुन्हा तिला पाचव्या सेटमध्ये पराभव मिळाला. पुढे तिने चांगली कामगिरी करत सहाव्या सेटमध्ये ११-५ असा विजय मिळवला. शेवटी सातव्या सेटमध्ये तिने ११-७ अशी कामगिरी करत पुढच्या राऊंडमध्ये आपली जागा पक्की केली आहे. (Manika Batra Advances To Next Round in Tokyo Olympics 2020 After Win Over Ukraine’s Margaryta Pesotska)
#TokyoOlympics | Indian table tennis player Manika Batra wins against Ukraine's Margaryta Pesotska 4-3 in the second round of the women's singles pic.twitter.com/5HaLRBs0uo
— ANI (@ANI) July 25, 2021
आता उपउपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना जागतिक क्रमवारीतील १६ व्या क्रमांकावरील खेळाडू सोफिया पोल्कानोवा होणार आहे.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’
-बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ






