भारतीय क्रिकेट संघ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीचे एक वेगळेच नाते आहे. अनेकदा भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या डेटचे किस्से ऐकायला मिळतात. तर, बऱ्याच क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्नही केले आहे. शिवाय, बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींचे आयपीएलमध्ये स्वत:चे संघदेखील आहेत.
ज्याप्रमाणे बॉलिवूड सिताऱ्यांची क्रिकेटबद्दलची आवड दिसून येते. त्याप्रमाणेच क्रिकेटपटूंचाही बॉलिवूड इंडस्ट्रीकडे थोडाफार कल असतोच. मात्र, एक असा भारतीय खेळाडू आहे ज्याच्या वास्तव आयुष्यात शाहरुखच्या प्रसिद्ध हिंदी चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’चा सर्वात रोमांचक सीन घडला आहे. हा सीन म्हणजे चित्रपटाच्या शेवटी शाहरुख पळत पळत रेल्वेमध्ये चढत असतो आणि काजोलला तिचे वडिल सोडण्यासाठी येतात. मजेशीर गोष्ट म्हणजे, हा सीन भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडेसोबत झाला आहे.
काही महिन्यापुर्वीच पांडेने दाक्षिणात्त्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीसोबत लग्न केले आहे. मात्र, डीडीएलजेचा सीन हा अश्रितासोबत नाही तर पांडेच्या लहानपणीच्या क्रशसोबत घडला घडला होता. क्रिकबजच्या स्पाइसी पिच शोमध्ये बोलताना पांडेने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला आहे. Manish Pandey Recalls That DDLJ Famous Scene Happened With Him In Real Life
पांडे म्हणाला, “आर्मी कुंटंब असल्यामुले आम्हाला दरवर्षी शिफ्ट करावे लागत असायचे. पण मला त्यात खूप मजा यायची. नविन लोकांना भेटणे, नविन मित्र बनवणे, वेगवेगळ्या संस्कृतीविषयी शिकणे मस्त वाटायचे. परंतु, माझ्या किशोरावस्थेत घडलेला एक किस्सा मला पूर्णपणे आठवण आहे. आम्ही रेल्वे स्टेशनवर होतो आणि सेनेतील काही परिवार आम्हाला सोडण्यासाठी आले होते.”
“त्यामध्ये माझा ज्या मुलीवर क्रश होता ती मुलगीही तिच्या वडिलांसोबत आली होती. म्हणजे, तो क्षण हा डीडीएलजेच्या शेवटच्या सीनसारखा होता. फक्त या गोष्टीची कमी होती की, चित्रपटात सिमरनचे वडील ‘जा सिमरन जा’ म्हणतात आणि इथे माझ्या क्रशच्या वडिलांना तिचा हात पकडून मागे सरक, अजून तू खूप छोटी आहेस,” असे म्हटले होते.
दरम्यान पांडेने आर्मी कुटुंब असल्यामुळे त्याच्या लहानपणीच्या वेळापत्रकाविषयी सांगितले. पांडेने २०१९ला विजय हजारे ट्रॉफी जिंकल्यानंतर २ डिसेंबर २०१९ला प्रेयसी अश्रिता शेट्टीसोबत लग्न केले.
ट्रेंडिंग घडामोडी-
रोहित शर्माला लॉकडाऊनदरम्यान या गोष्टीची येतेय सर्वात जास्त आठवण
व्हिडिओ: २१ वर्षांपूर्वी सचिनने केलेल्या ‘त्या’ शतकाने सर्वांना केले…
…नाहीतर रोहित शर्माचे टीम इंडियात परतणे होणार ‘महाकठीण’