कर्नाटकात सुरू असलेल्या देशांतर्गत टी२० लीग, महाराजा ट्रॉफीमध्ये (Manish Pandey) भारतीय क्रिकेटपटू मनिष पांडे धुमाकूळ घालत आहे. गेल्या वर्षभरापासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेल्या मनिषने गुलबर्ग मिस्टिक संघाचे नेतृत्त्व करताना ताबडतोब अर्धशतक झळकावले आहे. त्याच्या या कर्णधार खेळीच्या जोरावर गुलबर्ग संघाने शिवमोग्गा स्ट्राईकर्स संघावर ५ चेंडू शिल्लक असताना ३ विकेट्सने विजय मिळवला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शिवमोग्गा संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्स गमावत १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुलबर्ग संघाने १९.१ षटकातच ७ गड्यांच्या नुकसानावर शिवमोग्गा संघाचे आव्हान पूर्ण करत सामना जिंकला. या सामन्यात झंझावाती खेळी करणाऱ्या मनिषला (Manish Pandey) सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
मनिष पांडेचा कहर
मनिषने ३६ चेंडूत १३८.८८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ५० धावांची (Manish Pandey Half Century) खेळी केली. या खेळीसाठी त्याने ३ षटकार आणि २ चौकारही मारले. ३२ वर्षीय मनिषव्यतिरिक्त खालच्या फळीत कोदंदा अजित कार्तिक यानेही विस्फोटक खेळी केली. केवळ ९ चेंडू खेळताना त्याने २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. १ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने त्याने नाबाद २२ धावा फटकावल्या.
अशी राहिलीय मनिष पांडेची कारकीर्द
दरम्यान मनिषने २०१५ साली भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. परंतु त्याला भारतीय संघाकडून जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने आतापर्यंत भारताकडून फक्त ३९ टी२० आणि २९ वनडे सामने खेळले आहेत. ३९ टी२० सामने खेळताना ४४.३१ च्या सरासरीने त्याने ७०९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ अर्धशतके निघाली आहेत. तसेच वनडे क्रिकेटमध्ये २९ सामने खेळताना त्याने ३३.२९ च्या सरासरीने ५६६ धावा काढल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बटलर-बेअरस्टोला जमलं नाही ते ‘या’ वीस वर्षाच्या पोरान करून दाखवलं
‘त्या’ खेळाडूमध्ये भारतीय टी२० संघाचा कर्णधार बनण्याचे सर्व गुण, न्यूझीलंडच्या महान अष्टपैलूचा दावा
झिम्बाब्वे दौऱ्यात ‘या’ खेळाडूचे भारतीय संघात पदार्पण नक्की, तर वनडे विश्वचषक असेल लक्ष्य