---Advertisement---

पांडेजींची कमाल! सूर मारत टिपला वॉशिंग्टन सुंदरचा लाजवाब झेल, पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, एप्रिल 15, 2021 1:26 AM
---Advertisement---

बुधवारी (१४ एप्रिल) आयपीएल २०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर( आरसीबी ) व सनरायझर्स हैदराबाद यांच्यादरम्यान सामना खेळला गेला. आरसीबीने हा सामना जिंकून स्पर्धेतील आपला दुसरा विजय पूर्ण केला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा प्रमुख फलंदाज मनीष पांडेने एक शानदार झेल घेत चाहत्यांची मने जिंकली. सोशल मीडियावर या झेलाला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

पांडेजींची कमाल
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने नाणेफेक जिंकत आरसीबीला फलंदाजीचे निमंत्रण दिले. मात्र, नियमित अंतराने आरसीबीचे फलंदाज बाद होत राहिले. चौदाव्या षटकात एबी डिव्हिलियर्सबाद झाल्यानंतर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीसाठी आला. एक चौकार मारत त्याने चांगली सुरुवात केली.

मात्र, सोळाव्या षटकातील पाचवा चेंडू सुंदरने लॉंग ऑफच्या दिशेने उंचावरून मारला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असलेल्या मनीष पांडेने धावत येऊन सूर मारत हा झेल पकडला. पांडेने जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर कायले जेमिसनचा झेल देखील टिपला.

https://twitter.com/sportzhustle/status/1382356774083170306

पांडेची संथ फलंदाजी
आरसीबीने दिलेले १५० धावांचे आव्हान पूर्ण करताना मनीष पांडेवर मोठी जबाबदारी होती. मात्र या जबाबदारीचा त्याच्यावर दबाव आला. त्याने संघासाठी एक बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरीस ३९ चेंडूत प्रत्येकी दोन चौकार व दोन षटकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या. सतराव्या षटकात तो शाहबाज अहमदच्या गोलंदाजीवर बेजबाबदार फटका मारून बाद झाला.

आरसीबीचा थरारक विजय
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने ग्लेन मॅक्सवेलच्या ५९ व कर्णधार विराट कोहलीच्या ३३ धावांच्या जोरावर निर्धारित २० षटकात १४९ धावा काढल्या. हैदराबादसाठी जेसन होल्डरने सर्वाधिक ३ बळी मिळविले‌.

प्रत्युत्तरात, कर्णधार डेव्हिड वॉर्नर (५४) व मनीष पांडे (३८) यांच्या उपयुक्त खेळ्यांच्या जोरावर हैदराबादने हे आव्हान पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाहबाज अहमदने १७ व्या षटकात तीन बळी मिळवत सामना आरसीबीच्या बाजूने झुकविला. ग्लेन मॅक्सवेल सामन्याचा मानकरी ठरला. हैदराबादचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मला राग येतोय! आऊट होऊन मैदानातून बाहेर जाताना विराटचा चढला पारा, मग केले असे काही; व्हिडिओ व्हायरल

मराष्ट्रात लॉकडाऊन; मुंबईतील आयपीएल सामन्यांचे काय? घ्या जाणून

रोहित शर्माबद्दल ‘तसं’ ट्वीट करणे स्वीगीला पडले महागात; मागावी लागली चाहत्यांची माफी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---