पुणे । बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ज्युनियर(21वर्षाखालील) स्नूकरमध्ये मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या स्पर्श फेरवानी, सुमेर मागो, क्रिश गुरबक्षानी, चंदीगडच्या रणवीर दुग्गल या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत ज्युनियर(21वर्षाखालील) स्नूकर मुलांच्या ब गटात महाराष्ट्राच्या क्रिश गुरबक्षानी याने उत्तरप्रदेशच्या आमिर खानचा 3-0(74(58)-14, 44-39, 86(68)-02) असा सहज पराभव केला.
क्रिश याने आपल्या खेळीत पहिल्या व तिसऱ्या फ्रेममध्ये 58 व 68 गुणांचा ब्रेक नोंदविला. जे गटात महाराष्ट्राच्या स्पर्श फेरवानी याने आंध्रप्रदेशच्या गौतम प्रसादवर 3-0(72-08, 65-22, 93(50)-01) असा सनसनाटी विजय मिळवला.
प गटात जम्मू-काश्मीरच्या उमर उल इस्लाम याने ओडिशाच्या बरून नाईकला 3-0(94-57, 61-23, 56-41)असे पराभूत केले. ख गटात महाराष्ट्राच्या सुमेर मागो याने बिहारच्या आयुष सिन्हाला 3-1(68-47, 80(41)-13, 23-67(43), 100(44)-19) असे पराभूत केले.
क गटात हरयाणाच्या मेहोई सैनी याने झारखंडच्या अमन ठाकेरचा 3-2(64-04, 23-61, 50-61, 64-52, 71-59) असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल |
ज्युनियर स्नूकर मुले |
गटसाखळी फेरी |
गट अ: खाजा मोईनउद्दीन(आंध्रप्रदेश)वि.वि.सत्यन शिवहरे(मध्यप्रदेश)3-1(62-52, 79-49, 38-49, 62-37);
गट ब: क्रिश गुरबक्षानी (महाराष्ट्र)वि.वि.आमिर खान(उत्तरप्रदेश)3-0(74(58)-14, 44-39, 86(68)-02);
गट ब: कबीर शर्मा(महाराष्ट्र)वि.वि.जय चोपडा(गोवा)3-1(36-60, 57-17, 73-24, 75-26);
गट क: भौणीत वालिया(पंजाब)वि.वि.करमेश पटेल(गुजरात)3-2(77-52, 35-77, 01-84(50), 55-40, 63-30);
गट क: मेहोई सैनी(हरयाणा)वि.वि.अमन ठाकेर(झारखंड)3-2(64-04, 23-61, 50-61, 64-52, 71-59);
गट ड: विश्वजीत मोहन(उत्तरप्रदेश)वि.वि.जश्न बहल(पंजाब)3-1(83-48, 64-31, 36-69, 72-40);
गट ड: रणवीर सिंग मारवा(गुजरात)वि.वि.कुंज पटेल(गुजरात)3-1(56-44, 63-10, 09-68, 93(67)-15);
गट इ:एस. श्रीकृष्णा(पीएसपीबी)वि.वि.समीर कुमार(झारखंड) 3-0(59(49)-02, 63-02, 65-07);
गट इ: अल्ड्रीन मोसेस(कर्नाटक)वि.वि.पिनाक अनप(महाराष्ट्र)3-1(57-07, 66-10, 62-64, 43-26);
गट फ: विश्वास मंगला(हरयाणा)वि.वि.आनंद बरोट(गोवा)3-0(64-06, 65-12, 67-23);
गट ग: रयान राझमी(महाराष्ट्र)वि.वि.गौरव मल्होत्रा(हरयाणा)3-0(67-39, 88(32)-01, 67-14);
गट ग:अमन बनसोड(मध्यप्रदेश)वि.वि.जीत भोजानी(गुजरात)3-1(56-60, 54-43, 71-23, 62-19);
गट ह: रणवीर दुग्गल(चंदीगड)वि.वि.अली रजा खान(पश्चिम बंगाल)3-0(52-49, 62-10, 60-10);
गट जे: स्पर्श फेरवानी(महाराष्ट्र)वि.वि.गौतम प्रसाद(आंध्रप्रदेश)3-0(72-08, 65-22, 93(50)-01);
गट जे: वरून कुमार(कर्नाटक)वि.वि.अर्ष्णुर सिंग(हरयाणा)3-1(60-35, 11-62, 57-46, 66(40)-21);
गट के: ध्रुव चावला(पंजाब)वि.वि.दानिश खान(कर्नाटक)3-1(55-28, 58-23, 51-57, 66-48);
गट ओ: शयान राझमी(महाराष्ट्र)वि.वि.रिषभ भारद्वाज(बिहार)3-0(52-15, 49-27, 70-18);
गट प: ध्रुव पटेल(गुजरात)वि.वि.बिक्रम वीर सिंग(दिल्ली)3-0(50-25, 81-10, 66-23);
गट प: उमर उल इस्लाम(जम्मू व काश्मीर)वि.वि.बरून नाईक(ओडिशा) 3-0(94-57, 61-23, 56-41);
गट ख: सुमेर मागो(महाराष्ट्र)वि.वि.आयुष सिन्हा(बिहार)3-1(68-47, 80(41)-13, 23-67(43), 100(44)-19).