पुणे। बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ बिलियर्ड्स मुलांच्या गटात पीएसपीबीच्या ध्वज हरिया, सौरव कोठारी, ब्रिजेश दमानी आणि पंकज अडवानी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत वरिष्ठ बिलियर्ड्स गटात उपांत्यपूर्व फेरीत पीएसपीबीच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व राखले. चुरशीच्या झालेल्या लढतीत पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डच्या भारताचा क्र. खेळाडू ध्व्ज हरिया याने कडवी झुंज देत एस. श्रीकृष्णा याचा 4-3(26-151(140), 151(86,45)-56, 07-151(141), 07-151(144), 150(143)-74(74), 151(99)-38,
150(97)-147(100) असा संघर्षपूर्ण पराभव करत उपांत्य फेरीक मारली.
ध्व्ज याने आपल्या खेळीत पाचव्या फ्रेममध्ये सर्वाधिक 143 गुणांचा ब्रेक नोंदविला. 23वेळा जागतिक विजेतेपद पटकावणाऱ्या पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डच्या पंकज अडवानी याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डच्या नीरज कुमारचा 4-1(150(41,104)-77(55), 150(144)-05, 48-150(77), 151(133)-00, 151(147)-07) असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत ध्वज समोर पंकज अडवानीचे आव्हान असणार आहे.
अन्य लढतीत माजी जागतिक स्पर्धेतील विजेत्या सौरव कोठारी याने आरएसपीबीच्या सिद्धार्थ पारीख याचा 4-0(150(147)-92(89), 150(150)-00, 150(105)-76(74), 150(99)-105(104)) असा सहज पराभव करून आगेकूच केली. सौरव याने आपल्या खेळीत दुसऱ्या फ्रेममध्ये 150 गुणांचा हायेस्ट ब्रेक नोंदविला.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या पीएसपीबीच्या ब्रिजेश दमानी याने आलोक कुमारचा 4-0(150(109)-51, 150(84,67)-104(77), 150(51)-130(60), 150(62,83)-125(62)) असा एकतर्फी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल।
उपांत्यपूर्व फेरी।
वरिष्ठ बिलियर्ड्स।
ध्व्ज हरिया(पीएसपीबी)वि.वि.एस. श्रीकृष्णा(पीएसपीबी)4-3(26-151(140), 151(86,45)-56, 07-151(141), 07-151(144), 150(143)-74(74), 151(99)-38, 150(97)-147(100);
ब्रिजेश दमानी(पीएसपीबी)वि.वि.आलोक कुमार(पीएसपीबी)4-0(150(109)-51, 150(84,67)-104(77), 150(51)-130(60), 150(62,83)-125(62));
सौरव कोठारी(पीएसपीबी)वि.वि.सिद्धार्थ पारीख(आरएसपीबी)4-0(150(147)-92(89), 150(150)-00, 150(105)-76(74), 150(99)-105(104));
पंकज अडवानी(पीएसपीबी)वि.वि.नीरज कुमार(आरएसपीबी)4-1(150(41,104)-77(55), 150(144)-05, 48-150(77), 151(133)-00, 151(147)-07).