इंग्लंड संघ भारतीय दौऱ्यावर आला आहे. अशातच इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट हा भलत्याच चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो खोऱ्याने धावा करतोय. रूटने खेळलेल्या मागील ३ कसोटी सामन्यात २ दुहेरी शतक झळकावले आहेत. तसेच भारतीय संघाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात २१८ धावा करत त्याने भारतीय संघाकडून सामना हिसकावून घेतला होता. इंग्लंड संघाने हा सामना २२७ धावांनी आपल्या नावावर केला होता. अशातच रूटला लवकरात लवकर बाद कसे करावे हा प्रश्न भारतीय गोलंदाजांसमोर उपस्थित झाला आहे.
येत्या १३ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला रूटला बाद करण्यासाठी रणनीती आखण्यास पुरेसा वेळ मिळाला आहे. दरम्यान भारताचा क्रिकेटपटू मनोज तिवारीने रूटला कसे बाद करावे, याची रणनीती सांगितली आहे.
तिवारीने सांगितली रुटला बाद करण्याची रणनीती
भारतीय संघासाठी क्रिकेट खेळलेला बंगालचा क्रिकेटपटू मनोज तिवारीने रूटला लवकरात लवकर कसे बाद करता येईल यासाठी रणनीती आखली आहे. त्याने ट्विटरवर एक फोटो शेअर करत म्हटले आहे की, रूटसाठी ७/२ या प्रक्रारे क्षेत्ररक्षण सजवणे बरोबर असेल. म्हणजेच ७ क्षेत्ररक्षक ऑनसाईडला आणि २ क्षेत्ररक्षक ऑफ साईडला. आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे त्याने स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही ठेवला. भारतीय संघाला दुसरा कसोटी सामना जिंकायचा असेल तर जो रूट याला लवकरात लवकर बाद करणे गरजेचे आहे.
Since JoeRoot is in red hot form wit d bat. I have chalked out a field placement plan 4 Ashwin nd Washington if it might help.
Dis plan is only 4 Spinning friendly pitches. 7/2 on the On side wit No slip catcher. Zoom in d picture guys 4 detailed reasoning #INDvsENG pic.twitter.com/43PdCSHcX8— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) February 11, 2021
जो रूटची कामगिरी
इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट हा आपल्या सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. त्याने मागील ३ कसोटी सामन्यात २ दुहेरी शतक झळकावले आहेत. तसेच त्याने आतापर्यंत खेळलेल्या १०० कसोटी सामन्यात ५०.३ च्या सरासरीने ८५०७ धावा केल्या आहेत. यात त्याने ४९ अर्धशतक आणि २० शतक झळकावले आहेत. तसेच १४९ एकदिवसीय सामन्यात ५०.१ च्या सरासरीने ५६९२ धावा केल्या आहेत. यात त्याने ३३ अर्धशतक आणि १६ शतक केले आहे. याचबरोबर त्याने खेळलेल्या ३२ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३५.७ च्या सरासरीने ८९३ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
एकाच वनडे सामन्यात नाबाद २३२ धावा अन् ५ बळी घेणारी ‘फ्युचर सुपरस्टार’
नव्या फिटनेस टेस्टमध्ये ‘हे’ ६ क्रिकेटपटू फेल; भारतीय संघात स्थान मिळवणे होणार कठीण
भुवनेश्वर कुमार आता सांभाळणार कर्णधारपद, ‘या’ संघाची घोषणा